सलमान निर्मित ‘लवरात्री ‘ ट्विटरवर हिट 

मुबंई : पाेलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडचा होरो  सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा लवकरच आगामी  ‘लवरात्री ‘ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण  करतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सोहळ्याला सलमान खान, सोहेल खान, आयुष शर्माची पत्नी अर्पिता खान अशा सेलिब्रेटींनी हजेरी लावली. सलमान खानच्या हस्ते ‘लवरात्रीचा ‘ ट्रेलर लॉन्च करण्यात आला. दरम्यान हा ट्रेलर सलमान खानने त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंट वरून देखील शेअर केला आहे. ‘लवरात्री’चा  ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही वेळातच. लावरात्री ट्विटर वर टॉप ट्रेंड ठरला आहे.
[amazon_link asins=’B01DQM1KCK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d89b2728-9975-11e8-8745-41fc9bcd3cd7′]

या ट्रेलरमध्ये आयुष शर्मा आणि त्याची हिरोईन वरीना हुसैन यांची केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. दोघांचाही हा पहिला चित्रपट आहे. पण ट्रेलर पाहिल्यानंतर हा त्यांचा पहिला चित्रपट आहे, यावर विश्वास बसत नाही. गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारलेला ‘लवरात्रि’ एक रोमॅन्टिक चित्रपट आहे. ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज येतो. कदाचित वरीना गुजरातेत येते आणि येथे तिची भेट आयुषसोबत होते. मग दोघांची मैत्री आणि पुढे प्रेम. पण यासाठी दोघांनीही बऱ्याच अग्नी दिव्यातून जावे लागते, अशी याची ढोबळ कथा असल्याचे भासते.

अरबाज खान आणि सोहेल खान हे दोघंही या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय काही प्रसिद्ध टेलिव्हिजन चेहरेसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एकंदरच आता ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा ‘लवरात्री’ बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होतो, हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.
[amazon_link asins=’B06XMYM2PG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de16f54c-9975-11e8-925b-d95d525ba650′]

दरम्यान, या चित्रपटाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला होता. या चित्रपटाचे नाव नवरात्री, या शब्दाशी मिळते जुळते आहे. नवरात्रीला हिंदू संस्कृती मध्ये महत्वाचे स्थान आहे. या सिनेमामुळे भावना दुखावल्या जातील असे या संघटनांचे म्हणणे आहे.