Salman Salim Khan | ‘सिद्धू मुसेवाला करुन टाकू’, सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी, सलमानच्या सुरक्षेत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान (Salman Salim Khan) आणि त्याचे वडील लेखक सलीम खान (Salim Khan) यांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचे पत्र (Letter) मिळाले आहे. या पत्रामध्ये दोघांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच सलमान खानच्या सुरक्षेत (Security) वाढ करण्यात आली आहे. (Salman Salim Khan)

 

काय लिहलंय पत्रात?

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम खान सकाळी फिरण्यासाठी गेले होते. तिथे ते एका बाकावर बसले असताना त्यांना हे धमकीचे पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) करु’ असे पत्रात लिहिण्यात आले आहे. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

 

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

काही दिवसांपूर्वी पंजाबी रॅपर सिद्धू मूसेवाला याची गोळ्या झाडून (Firing) हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडली होती.
पंजाब सरकारने (Government of Punjab) मूसेवालाची सुरक्षा कमी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.
आता सलमान खानला आलेल्या या धमकीमुळे खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Salman Salim Khan | bhaijaan salman khans father salim khan threatened to kill case filed against unknown person

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा