12 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाला होता ‘भाईजान’ सलमान ! कधीच करू शकला नाही ‘प्रपोज’

पोलिसनामा ऑनलाइन – तुम्हाला हे माहित आहे का की, बॉलिवूड स्टार सलमान खान आयुष्यात कोणाच्या प्रेमात पडला होता. अनेकांना याबाबत माहिती नसेल. आज आपण यासंदर्भात माहिती घेऊयात.

सलमान खान ज्या अभिनेत्रीच्या पहिल्यांदा प्रेमात पडला ती अभिनेत्री रेखा आहे. खुद्द रेखानंच बिग बॉस मध्ये प्रमोशनसाठी आल्यानंतर यासंदर्भात खुलासा केला होता.

रेखानं सांगितलं होतं की, ती जॉगिंगला जायची तेव्हा सलमान तिच्या मागे सायकल चावलत येत असे. सलमाननंही सर्वांसमोर ही गोष्ट कबूल केली होती. त्याचं रेखावर प्रेम तर होतंच शिवाय तो तिच्यासोबत लग्नही करणार होता.

सलमाननं त्याच्या पालकांनाही सांगितलं होतं की, तो रेखासोबत लग्न करणार आहे. रेखा सलमानच्या शेजारी रहात होती. ती जिथे जायची सलमान तिच्या मागे जात असे.

अनेकांना माहिती नसेल परंतु आपल्या चाईल्डहुड क्रश सोबतच सलमाननं बॉलिवूडमध्ये पहिला सिनेमा केला होता. या सिनेमाचं नाव आहे बीवी हो तो ऐसी. 1988 साली आलेल्या या सिनेमात फारूख शेख आणि रेखा लिड रोलमध्ये होते तर सलमान सपोर्टीव्ह रोलमध्ये होता.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळं हे शक्य झालं नाही.