आता सलमानचे वडील देखील क्रिकेट बेटिंग प्रकरणात ?

मुंबई : वृत्तसंस्था

आयपीएल बेटिंग प्रकरणात अभिनेता अरबाज खान ,साजिद खान यांची नावे पुढे आल्यानंतर आता यात अरबाज खान चे वडील सलीम खान यांचे नावही समोर आले आहे. याबाबतची माहिती बुकी सोनू जलालने पोलिसांना दिल्याचे समजते आहे. याबाबत तो म्हणाला की, सलमान खानचे वडील सलीम खान देखील पूर्वी सत्ता लावत होते. ,मात्र आताही ते सट्टा लावतात की नाही हे मला माहीत नाही असे बुकी सोनू जलाल ने म्हंटले आहे. या माहितीमुळे सलीम खान यांचा आयपीएल बेटिंग प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान , सलीम खान यांचा मुलगा अभिनेता आवाज खान याने आयपीएल मधील सामान्यांवर सट्टेबाजीकेल्याची कबुली देखील अरबाज ने दिल आहे. गेल्या पाच वर्षांपासून अरबाज बुकी सोनू जलानच्या संपर्कात होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांवर आपण आतापर्यंत सट्टा लावला असून बेटिंगमध्ये काही वेळा जिंकल्याचीही कबुली अरबाजने दिली. मात्र आपल्या कुटुंबाला सट्टा लावने पसंत नसल्याचेही अरबाज याने सांगितले आहे.आपण बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणला, असा दावा अरबाजने केला आहे.