सलमानच्या ‘लवरात्री’चा टिझर रिलीज

मुंबई :वृत्तसंस्था

शाहरुख खानच्या आगामी चित्रपट ‘झिरो ‘  सिनेमाचा टिझर रिलीज ची घटना ताजी असतानाच आता सलमान खानने देखील त्याच्या आगामी ‘लव्हरात्री’ चित्रपटाचा टिझर ट्विटर वरून रिलीज केला आहे. या सिनेमाची खासियत अशी की, या चित्रपटातून सलमान खानची बहीण अर्पिताचा नवरा आयुष शर्मा डेब्यू करीत आहे. तर यात अभिनेत्री वरिना हुसैन त्याच्यासोबत पदार्पण करत आहे. लावरात्री द्वारे हि नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. इंग्रजी, गुजराती, उर्दू आणि हिंदी अशा चार भाषांमध्ये ट्वीट करत सलमानने टीझर शेअर केला आहे. ५ ऑक्टोबर २०१८ रोजी ‘लव्हरात्री’ प्रदर्शित होणार आहे.

‘#LoveratriTeaser’ सोबत प्रेमाच्या रंगात रंगून जाण्यास सलमान चाहत्यांना सांगत आहे.सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली ‘लव्हरात्री’ या सिनेमाची निर्मिती करण्यात येत आहे. लव्हरात्री हा सलमान खान फिल्म्सचा पाचवा चित्रपट आहे. .या सिनेमाचे दिग्दर्शन अभिराज मिनावाला करत आहे. अभिराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याने फॅन, गुंडे, जब तक है जान, गुंडे यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.लव्हरात्री हा चित्रपट आयुष शर्मासाठी मोठा ब्रेक मानला जात आहे. सलमानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांचं २०१४ मध्ये लग्न झाले होते . त्यांना अहिल हा मुलगा आहे.

दरम्यान, काही हिंदुत्ववादी संस्थानी या चित्रपटाच्या नावावरून मोठा विरोध दर्शवला होता. त्यांच्या मते लावरात्री हे नाव नवरात्री या महत्वपूर्ण सणाशी जोडले गेले आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या आमच्या भावना दुखावल्या जाणार आहेत . असे या संस्थानचे मत होते . त्यामुळे लावरात्री या नावाला विरोध दर्शवण्यात येत होता. मात्र अखेरीस सलमानने लावरात्री या नावानेच हा टिझर ट्विटरवर शेअर केल्यामुळे तो चित्रपटाच्या नावात बदल करणार नाही हे निश्चित झाले आहे.