सलमानचे ओरिजिनल ब्रेसलेट आता फ्लिपकार्ट वर जाणून घ्या,किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- अभिनेता सलमान खानाचे तुम्ही फॅन असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. सलमानच्या हातात नेहमी दिसणारे ‘बीइंग ह्यूमन’ चे ब्रेसलेट आता तुम्ही देखील घालून शकणार आहात.सलमान खानने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून ही माहिती दिली आहे. तुम्ही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिप कार्ट वरून हे बीइंग ह्यूमन ब्रेसलेट मागवू शकता.

वडिलांकडून माझ्याकडे , माझ्याकडून खास तुमच्यासाठी…

हे बीइंग ह्यूमन ब्रेसलेट ऑनलाईन लॉन्च करताना त्याने त्याच्या वडिलांचा आणि त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलमान खानच्या वडिलांच्या हातात देखील हे ब्रेसलेट दिसत आहे. “बाबांकडून माझ्याकडे, माझ्याकडून खास तुमच्यासाठी ” माझे ओरिजिनल ब्रेसलेट तुमच्यासाठी असे म्हणत हे ब्रेसलेट अभिनेता सलमान खानने हे फ्लिपकार्ट वर लॉन्च केले आहे. फ्लिप कार्ट सोबत हे ब्रेसलेट ‘बीइंग ह्यूमन’ च्या स्टोअर्स मध्ये देखील उपलब्ध होणार आहे.

या ब्रेसलेट विषयी

सलमान खान नेहमी परिधान करीत असलेले हे ब्रेसलेट चांदी चे आहे . मात्र जे फ्लिपकार्ट वर तुम्हाला मिळणारे आहे ते ब्रेसलेट सिल्व्हर प्लेटेड असून मध्यभागी निळ्या रंगाचे आहे. याची किंमत ६९९ रुपये इतकी आहे. हे ब्रेसलेट फ्री साईज मध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या ब्रेसलेट साठी काही बँकांच्या कार्डवर खरेदी केल्यास यावर सूट मिळणार आहे तसेच ईएमआय वर देखील हे ब्रेसलेट खरेदी करता येणार आहे. ऍक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर ५ % सवलत देण्यात आली आहे.

सलमान सारखी हेअरस्टाईल त्याचा लुक तंतोतंत कॉपी करणारे पुष्कळ फॅन्स आहेत आता सलमानने खास त्याच्या चाहत्यांनकरिता बीइंग ह्यूमन ब्रेसलेट देखील बाजारात आणले आहेत. यामुळे हे ब्रेसलेट खरेदी करण्यासठी त्याचे फॅन्स ऑनलाईन गर्दी करणार हे निश्चित.