कडक सॅल्युट ! SP मॅडमने स्थलांतरित महिलांसाठी मध्यरात्री स्वतःच्या घरीच जेवण बनवलं

हैदराबाद : वृत्त संस्था – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी माणुसकीच दर्शन घडत असल्याचं आपल्याला दिसत आहे. अनेक जण आपल्याला जमेल त्या माध्यमातून मदत करताना या काळात दिसत आहे. देशात कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलं आहे. जवळपास २ महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे देशातील मजुरांच, कष्टकऱ्यांच आर्थिक गणित बिघडलं असून त्यांना अनेक हाल-अपेष्टांना तोंड द्यावं लागत आहे. शहरात हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ मजुरांवरती आल्याने, त्यांनी आपला घरचा रस्ता पकडला आहे.

गावाकडं निघालेले हे मजूर मिळेल त्या मार्गाने आपला प्रवास करत आहे. तर काहीजण गाडीची वाट न पाहता चालतच मैलो मैल अंतर कापत आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात असं करत पायी प्रवास पूर्ण करत असल्याचं दिसत आहे. आंध्रप्रदेशातील नेल्लुर जिल्ह्यातून काही महिला विजयनगर येथे पायी जात होत्या. उपाशीपोटीच त्यांचा प्रवास सुरु होता. त्यांच्या जवळ खाण्यास देखील काही नव्हते. त्यामुळे, या महिलांनी विजयनगरच्या एसपी बी राजा कुमारी यांना फोन केला. या महिलांचा फोन आल्यानंतर राजा कुमारी आणि स्वतःच्या घरात या महिलांसाठी भोजनाची व्यवस्था केली.

संबंधित महिलांनी रात्री १२ च्या सुमारास मला फोन केला, तसेच त्यांनी २-३ दिवसांपासून चालत असून, पोटात अन्नाचा कण देखील नसल्याचं त्यांनी म्हटलं. तर आम्ही ११ जण विजयनगरच्या चेकपोस्टवरती थांबलो असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी, मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून जेवणाची काही व्यवस्था होतेय का ते पहा, असं सांगितलं असता त्यांनी लॉकडाऊन मुळे शक्यता कमी आहे, पण आम्ही ब्रेड भेटेल का ते पाहतो, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर, ब्रेड सुद्धा न भेटल्याने मी घरातच लेमन राईस बनवून चेकपोस्ट वरती नेला, असं राजा कुमारी म्हणाले.

चेकपोस्ट जवळच्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये या संबंधित महिला थांबल्या होत्या. त्या सर्वांना लेमन राईस दिला, त्यांनी जेवण केलं. मग, त्यांची सोय पाहून मी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास घरी आले. गावातील कुणीतरी या महिलांना माझा नंबर दिला होता. त्यांना मी सांगितलं होत की, काही अडचण आली तर फोन करा. त्यामुळे या महिलांनी मला थेट फोन केला असल्याचं कुमारी यांनी म्हटलं. एसपी मीरा कुमारी यांच्या या संवेदनशीलतेच सर्व स्तरातून कौतुक होत असून, या संदर्भातील फोटो विजयनगर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर करत माहिती दिली.