मुसळधार पावसातही कर्तव्य बजावणार्‍या वायरमनला ‘सॅल्यूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुसळधार पावसात देखील विद्युत पुरवठा करण्यासाठी करण्यासाठी वायरमन कार्यरत असतात.संबंधित कर्मचार्‍यांना पावसात भिजत जीवाची पर्वा न करता काम करावे लागते. अशाच एका वायरमनचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे .

चारही बाजूने विजेच्या खांबा भोवती पाणी साठले आहे. अशा परिस्थितीत हा वायरमन स्वतःच्या जीवावर उदार होऊन काम करत आहे. घरातील अंधार जाऊन उजेड यावा म्हणून धडपडणार्‍या या वायरमन आणि त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे कौतुक नेटकर्‍यांनी केले आहे. मुसळधार पावसाने सावगांव बेनकनहळी, मंडोळी, हंगरगा परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी मंडोळी सावगांव रोडवरील पुलाजवळील विजेच्या खांबावर दुरुस्ती करण्यासाठी वायरमन जीव धोक्यात घालून तेथे गेला. विजेच्या खांबाला चारही बाजूने पाण्याने वेढले होते. तरीही धाडसाने वायरमनने दुरुस्ती करून चार गावातील वीज पुरवठा सुरळीत केला.