Sairat मधील ‘सल्या’ अन ‘लंगड्या’चा ‘Free Hit Danka’ ! ‘तानाजी-अरबाज’ पुन्हा दिसणार एकत्र

पोलीसनामा ऑनलाइन –  सैराट (Sairat) सिनेमात परशाचे मित्र म्हणून दिसलेले सल्या आणि लंगड्या या सैराटनंतर रुपेरी पडद्यावरून जणू काही गायबच झाल होते. परंतु आता सल्या म्हणजेच अरबाज शेख (Arbaz Shaikh) आणि लंगड्या म्हणजेच तानाजी गलगुंडे (Tanaji Galgunde)पुन्हा एकदा मैत्रीची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सुनिल मगरे डायरेक्टेड फ्री हिट दणका (Free Hit Danka) हा सिनेमा लवकरचत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अरबाज आणि तानाजी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. मैत्रीची वेगळी परिभाषा मांडणाऱ्या या सिनेमाचं पोस्टर काही दिसवांपूर्वीच रिलीज करण्यात आलं होतं. आता लॉकडाऊननंतर या नवीन सिनेमाची घोषणा पुन्हा करण्यात आली आहे. एस जी एम या निर्मात्या कंपनीनं ही घोषणा केली आहे.

View this post on Instagram

सादर करत आहोत..एका दणकेबाज चित्रपटाचे दणकेबाज नाव… फ्री हिट दणका दिग्दर्शक- सुनील गोविंद मगरे निर्माता- उमेश नरके,धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी, विकास कांबळे, प्रवीण जाधव, सुनील गोविंद मगरे सह निर्माता- सुधाकर लोखंडे पटकथा-संवाद-गीतलेखन- संजय नवगिरे संगीत- बबन अडागळे, अशोक कांबळे छायाचित्रण- वीरधवल पाटील जनसंपर्क- अमृता छाया माने सामाजिक माध्यमे- Friendship Multimedia जाहिरात प्रसिद्धी- मिलिंद मटकर #marathi #marathifilm #marathiactress #marathistatus #marathimulgi #marathimulga #zeemarathi #marathicelebs #marathisong #marathiwedding #marathijokes #marathiquotes #marathifunny #marathimusically #marathicelebrity #marathiinspirations #marathiculture #marathi_movie #freehitdanka #danka #hitdanka #cooming_soon

A post shared by Free Hit Danka (@freehitdanka) on

सुनील मगरे सिनेमाचं डायरेक्शन करणार आहेत. या सिनेमाचे संवाद, पटकथा आणि गीत लेखन संजय नवगिरे करणार आहेत. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा ही उमेश नरके, धर्मेंद्र सिंग, प्रसाद शेट्टी विकास कांबळे, प्रवीण जाधव सांभाळत आहे. सुधाकर लोखंडे सिनेमाचे सहनिर्माता आहेत.

या सिनेमाचं संगीत बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी केलं आहे. सिनेमाचं छायाचित्रण वीरधवल पाटील करणार आहेत.

You might also like