अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पडळकरांचा टोला; म्हणाले – ‘…तो ‘माय का लाल’ समाधान आवताडे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. यावरून भाजप राष्ट्रवादीवर निशाणा साधत आहेत. यामध्येच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विधानावर जोरदार टीका केलीय. त्यावेळी अजित पवार म्हणाले होते की, तीन पक्ष एकत्र आल्यास कोण माय का लाल निवडून येत नाही, असे भाष्य त्यांनी केले होते. यावर गोपीचंद पडळकर यांनी तो ‘माय का लाल’ समाधान आवताडेच म्हणत पवार यांना टोला लगावला.

अजित पवार यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकी सभेवेळी एक वक्तव्य केलं होत की, चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येणार नाही. तसेच अनेक भाजप नेत्यावर देखील त्यांनी टीका केली होती. परंतु राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पोटनिवडणुकीत हार पत्करावी लागली. पवार यांच्या वक्तव्यावरून आमदार पडळकर यांनी निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, अजित पवार यांनी म्हटले होते की, तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येत नसतो, मात्र, तो माय का लाल म्हणजे समाधान आवताडे असल्याचे १५ ते २० दिवसामध्ये राज्याला दिसलं आहे. असे पडळकर म्हणाले. तर भारत नाना भालके हे लोकांमध्ये राहणारे नेतृत्व होते, पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्यासारखा लोकांमध्ये मिसळणारा दुसरा नेता नव्हता. याशिवाय त्यांच्या निधनाने सहानुभूतीही भगिरथ भालकेंसोबत होती. तरी देखील, लोकांनी समाधान आवताडेंना स्विकारलं असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.