आजम खान यांना मोठा ‘झटका’ ! योगी सरकार परत घेणार ‘जौहर’ची 50 एकर जमीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रामपूरमध्ये 500 एकर जमीनीवर पसरलेल्या आजम खान यांच्या मोहम्मद अली जौहर विद्यापीठाकडून 50 एकर जमीन (100 बिघे) राज्य सरकार परत घेणार आहेत. प्रयागराज स्थित महसूल बोर्ड न्यायालयाने योगी सरकारने निर्देश दिले आहेत की आजम खान यांच्या विद्यापीठाकडून जवळपास 50 एकर जमीन परत घ्यावी.

रामपूरचे समाजवादी पक्षाचे खासदार आजम खान या विद्यापीठाचे संस्थापक आहेत. महसूल बोर्डाने आदेश दिले की आजम खान यांनी ही जमीन 12 दलित लोकांकडून खरेदी केली होती. यादरम्यान आजम खान यांनी जमीनदारी निर्मुलन आणि जमीन सुधारणा कायद्याचे उल्लंघन केले होते. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हणले की उत्तर प्रदेश सरकारने मोहम्मद अली जौहर विद्यापीठाची ही जमीन परत घ्यावी. राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यानंतर विद्यापीठाचे क्षेत्र कमी होईल.

आजम खान फरार म्हणून घोषित –
उत्तर प्रदेशच्या एका न्यायालयाने मागील आठवड्यात आजम खान यांना या प्रकरणी फरार घोषित केले आहे. आजम खान यांना रामपूर न्यायालयात आचार संहितेच्या उल्लंघनाप्रकरणी हजर व्हायचे होते. न्यायालयाकडून अनेकदा समन्स बजावून देखील आजम खान न्यायालयात हजर झाले नाहीत. आजम खान यांना न्यायालयाने त्यांचा मुलगा अब्दुल्लाह आजमद्वारे सादर करण्यात आलेल्या खोट्या जन्म प्रमाणपत्राच्या प्रकरणी देखील समन्स बजावला होता.

रामपूर एडीजे न्यायालयाने आजम खान, त्यांची पत्नी तंजीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्लाह आजम यांना न्यायालयात हजर होण्यासाठी नोटीस पाठवली होती. हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात वॉरंट देखील काढण्यात आले होते. असे असताना देखील आजम खान आणि त्यांचे कुटूंबीय न्यायालयात हजर राहिले नाहीत.

फेसबुक पेज लाईक करा –