Coronavirus : ‘कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट’; उत्तरप्रदेशातील खासदाराचं विधान

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आतापर्यंत देशभरात कोरोना (Corona disease) मुळे तब्बल तीन लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन कोटींवर देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोहोचली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,८५,७४,३५० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १,३२,३६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर २७१३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना ( Corona disease ) मुळे आतापर्यंत देशभरात तब्बल ३,४०,७०२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान काही राजकीय पक्षाचे नेते हे कोरोनासंदर्भात वादग्रस्त विधानं करत आहेत.

दरम्यान, कोरोनाला पळवून लावण्यासाठी अजब उपाय सांगत आहे.
तर एका खासदाराने कोरोनाला पळवून लावण्यासाठी वादग्रस्त विधान केलं आहे.
“कोरोना हा आजार नाही, अल्लाहसमोर रडत माफी मागितल्यास होईल नष्ट” असं वादग्रस्त विधान सपा खासदाराने केलं आहे.
तसेच “कोरोना जर आजार असता तर जगात त्यावर काहीतरी उपाय असता.
कोरोनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट आहे.
अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट नष्ट होईल.” असं ही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्यांच्याच पक्षाच्या अन्य एका खासदाराने अशाच पद्धतीचं विधान केलं आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.

मी गेल्याच वर्षी कोरोना हा काही आजार नसल्याचं म्हटलं होतं.
आजार असता तर त्यावर उपाय असता, पण असं कोरोनासंदर्भात नाहीय.
अल्लाहसमोर रडत रडत आपल्या चुकींसाठी माफी मागणं हा कोरोनावर मात करण्याचा, त्याला नष्ट करण्याचा एकच मार्ग आहे.
शफीकुर्रहमान बर्क यांनी यांनी भाजपा सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
सध्याच्या सरकारने शरीयतमध्ये छेडछाड करण्याबरोबरच आपल्या कार्यकाळामध्ये मुलींना पकडून देत त्यांच्या बलात्कार करणे, मॉब लिचिंग आणि इतरही अनेक गुन्हे सरकारने केलेत ज्यामुळे कोरोनासारखं मोठं संकट देशात आलं आहे.
आम्ही मुस्लिमांना मशिदींमध्ये आणि मदरशांमध्ये नमाज पठणाची परवानगी मागितली होती.
मात्र सरकारने आमचं म्हणणं ऐकलं नाही.
या चुकींमुळेच आज अनेक संकट येत आहेत” असंही शफीकुर्रहमान यांनी म्हटलं आहे.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !