क्राईम स्टोरीताज्या बातम्यामनोरंजन

Samantha Prabhu | अभिनेत्री समंथाच्या विरोधात गुन्हा दाखल, जावं लागेल जेलमध्ये? जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – दक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Prabhu) काही दिवसांपासून तिच्या आगामी चित्रपट ‘पुष्पा द राईज’ यामुळे प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत आहे. तसेच समंथा काही काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलदेखील चर्चेत आली होती. समंथा (Samantha Prabhu) आणि तिचा पती नागा चैतन्य (Naga Chaitanya) काही वैयक्तिक कारणांमुळे विभक्त झाले. नुकतंच वैयक्तिक आयुष्यातल्या या समस्यांचा सामना करत असताना, तिच्यापुढे आता खाजगी आयुष्यात आणखीन एक नवीन समस्या उभी राहिली आहे.

 

समंथाचा आगामी चित्रपट ‘पुष्पा’ या चित्रपटांमधील ‘ओ अंतया ओ’ हे गाणं प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यातील संमंथाचा डान्स बघून प्रेक्षक चांगलेच थक्क झाले होते. परंतु आता ती त्याचं गाण्यामुळं अडचणीत आली आहे. समंथाचं हे गाणं एका संस्थेला अजिबात आवडलं नाहीये. त्यामुळे त्या संस्थेने अभिनेत्री संमंथाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Samantha Prabhu)

काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचा ‘पुष्प द राईज’ (Pushpa The Rise) या चित्रपटांमधील ‘ओ अंतया ओ’चं आइटम सॉंग रिलीज झालं होतं. यामध्ये तिनं डान्स केला असून, तिचा लुक आणि नृत्य प्रेक्षकांना चांगलं आवडलं होतं. एका पुरुष संघटनेनं या गाण्यावर तक्रार दाखल केली आहे. या संघटनेने म्हंटलं की, या गाण्याचे बोल पुरुषांच्या विरोधात असून, या गाण्यामध्ये पुरुषांची वाईट विचारसरणी व्यक्त केली आहे. तर पुरुष नेहमीच खराब विचार करत असतात, असं या गाण्यामधून दिसून येतं. त्यामुळे हे गाणं या चित्रपटांमधून काढून टाकण्याची मागणी या पुरुष संघटनेनं केली आहे.

 

दरम्यान, ‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
तर त्यामध्ये अल्लु अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका (Rashmika) पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.
परंतु या चित्रपटांमधील आयटम सॉन्ग वादात अडकल्यामुळे चित्रपटदेखील आता वादात सापडतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मात्र या पुरुष संघटनेनं समंथा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे तिच्यापुढे आता एक नवीन अडचण ठाण मांडून बसली आहे.

 

Web Title :- Samantha Prabhu | case filed against samantha will have to go to jail know more in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shama Sikander | लाल रंगाची बिकिनी घालून शमा सिकंदर उतरली स्विमिंग पूलमध्ये, हॉट फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं ‘तापमान’

Supreme Court | महाराष्ट्र भाजपला झटका ! 12 आमदारांच्या निलंबनाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, पुढील सुनावणी 11 जानेवारीला

LPG Cylinder | एलपीजी सिलेंडर बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देतंय, जाणून घ्या स्कीम

Back to top button