HomeमनोरंजनSamantha Prabhu | घटस्फोटावर समंथाने सोडलं मौन, म्हणाली - 'मी सगळ सहन...

Samantha Prabhu | घटस्फोटावर समंथाने सोडलं मौन, म्हणाली – ‘मी सगळ सहन केलं, पण गर्भपात, अफेअर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Samantha Prabhu | साऊथची अभिनेत्री समंथा प्रभूने (Samantha Prabhu) 2017 साली अभिनेता नागा चैतन्य अक्कीनीनेसोबत (Naga Chaitnya Akkineni) लग्न केलं होतं. या जोडीला केवळ साऊथमधूनच नव्हे तर देशभरातून प्रेम मिळालं होतं. त्यांची जोडी आवडत्या जोडींमधील एक मानली जात होती. मात्र सततच्या होणाऱ्या वादामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेऊन घटस्फोट (Divorce) घेतला.

 

नागा चैतन्य आणि समंथाच्या (Samantha Prabhu) घटस्फोटामुळे त्यांचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. यानंतर समंथावर अनेक आरोप करण्यात आले. एवढंच नाही तर अनेकांनी घटस्फोट समंथाच्या चुकीमुळे झालं असल्याचं म्हटलं होतं. सततच्या आरोपांमुळे आता समंथाने तिच्या घटस्फोटाबाबत मौन सोडलं आहे.

 

समंथा प्रभूने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या घटस्फोटाबाबत खुलासा केला आहे. यावेळी तिने माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले, मी संधीसाधू आहे, मला मूल नको होतं, मी गर्भपात (Abortion) केला, माझे अफेअर्स आहेत, असे आरोप माझ्यावर करण्यात आलं असल्याचं समंथाने म्हटलं आहे.

 

यासोबतच हे सर्व आरोप केले असले तरी घटस्फोट माझ्यासाठी खूप कठीण होता.
त्या वेळी मी खूप कठीण परिस्थितीतून गेली असल्याचं समंथाने म्हटलं आहे.
याबाबत तिने पोस्ट देखील केली आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं तर चाहत्यांनी पाठिंबा देत कमेंट्स केल्या आहेत.

 

Web Title :- Samantha Prabhu | Samantha Prabhu reveals-abortion-affair said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News