Samantha Prabhu | पुष्पाच्या आयटम साँगमधील सामंथा प्रभूच्या ग्लॅमरस अवताराने चाहत्यांच्या हृदयाची वाढवली धडधड

मुंबईपोलीसनामा ऑनलाईन – Samantha Prabhu | साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Madanna) सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘पुष्पा: द राइज’साठी (Pushpa: The Rise) चर्चेत आहेत आणि आता या चित्रपटाच्या आयटम साँगचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. या गाण्यात साऊथची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा प्रभूच्या (Samantha Prabhu) ग्लॅमरस अवताराने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. समंथा रुथ प्रभूने या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. चित्रपट निर्माते या गाण्याला वर्षातील सर्वात धमाकेदार गाणे म्हणत आहेत. निर्मात्यांनी या गाण्याचा लिरिकल व्हिडिओ नुकताच रिलीज केला असला तरी हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच हिट झाला आहे. हे गाणे संगीतकार देवी प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे. जे एकापेक्षा जास्त आयटम नंबर देण्यासाठी ओळखले जातात.

 

 

 

 

‘पुष्पा दा राइज’ (Pushpa: The Rise) या चित्रपटातील आयटम साँगचा लिरिकल व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपट निर्मात्यांनी ट्विटरवर अभिनेत्री सामंथा प्रभूच्या आयटम सॉंगमधील लूकचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘हा हिवाळा 10 डिसेंबर रोजी सामंथाच्या मूव्ह्स, ‘सिझलिंग सॉन्ग ऑफ द इयर’ने गरम होणार आहे. या फोटोमध्ये समांथा ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. या गाण्यातील त्याची धमाकेदार स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

सामंथा प्रभू (Samantha Prabhu) पहिल्यांदाच अर्जुन अल्लूसोबत डान्स नंबरमध्ये दिसणार आहे. संगीतकार देवी प्रसाद (Devi Prasad) यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे, तर हे गाणे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केले असून हिंदीतील गीते रकीब आलम यांनी लिहिली आहेत. या गाण्याचे हिंदी व्हर्जन कनिका कपूरने गायले आहे, जी आपल्या गाण्यांनी पार्टीला थिरकण्यासाठी ओळखली जाते.

चित्रपट पुष्पा द राइज दोन भागांमध्ये बनविला गेला आहे, त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चंदन तस्करांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शनसोबत रोमान्सची छटा पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती मनीष शाह यांनी केली असून दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.
या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे.
हे दोघे पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.
अशा परिस्थितीत हा चित्रपट पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web title : Samantha Prabhu | samantha ruth prabhu new song dance number for pushpa the rise oo bolega ya oo oo bolega out now

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक;
पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक

PM Kisan | ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

Gold Price Today | महाग झाले सोने, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा नवीन दर

Disadvantages of Drinking Hot Water in Winter | हिवाळ्यात वारंवार गरम पाणी पिण्याची सवय तुम्हाला सुद्धा आहे का?
होऊ शकते गंभीर नुकसान

Maharashtra Temperature | महाराष्ट्रात आणखी काही दिवसांनंतर थंडीची लाट;
पुण्यात तापमानाचा पारा 12 अंशावर

Sanjay Raut | संजय राऊतांची शरद पवारांसमोर फटकेबाजी; पहिल्यांदा खुर्ची दिली तर आता म्हणाले, फक्त..