Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने आलिया, कतरीना, दीपिकाला पाजले पाणी, ‘या’ बाबतीत केली मात!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Samantha Ruth Prabhu Number One Actress | ’पुष्पराज : द राइज’मध्ये दिसलेली समंथा रुथ प्रभूने आता कतरिना कैफ, आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, रश्मिका मंदांना आणि पूजा हेगडे यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकाची रिसर्च अभिनेत्री बनली आहे. हा सर्व्हे ओरमॅक्सने केला आहे. सामंथा रुथ प्रभू भारतातील सर्वात लोकप्रिय महिला अभिनेत्रींमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. (Samantha Ruth Prabhu Number One Actress)

 

Ormax Star India Loves च्या संशोधनात असा दावा केला आहे की, मे 2022 पर्यंत, सामंथा रुथ प्रभू भारतातील सर्वात लोकप्रिय महिला अभिनेत्रींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत.

 

 

तर दुसर्‍या क्रमांकावर आलिया भट्ट, तिसर्‍या क्रमांकावर नयनतारा, चौथ्या क्रमांकावर दीपिका पदुकोण, पाचव्या क्रमांकावर काजल अग्रवाल, सहाव्या क्रमांकावर कीर्ती सुरेश, सातव्या क्रमांकावर कतरिना कैफ, आठव्या क्रमांकावर रश्मिका मंदाना, नवव्या क्रमांकावर पूजा हेगडे तर अनुष्का शेट्टी दहाव्या स्थानावर आहे.

 

दीपिका पदुकोणने आलियाला मागे टाकले
या सर्वेक्षणाची माहिती पपाराझी भयानी यांनी इंस्टाग्रामवर व्हायरल केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, लोकांनी विचारले की कोरोनानंतर काय बदलले आहे. आता याचे एक ताजे उदाहरण येथे आहे. समंथा रुथ प्रभू ही संपूर्ण भारतातील पहिल्या क्रमांकाची अभिनेत्री आहे.

 

 

तिने दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनाही मागे टाकले आहे. हे सर्वेक्षण ओरमॅक्सने केले आहे.
विरल भयानीच्या पोस्टला 9000 हून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

 

 

त्याचबरोबर अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. अनेक लोकांनी यावर समंथाचे अभिनंदन केले आहे.
तर अनेकांनी आलिया भट्ट आणि रश्मिका मंदान्ना यांना नंबर वन म्हटले आहे.

समंथाने नाग चैतन्यपासून घेतला घटस्फोट
समंथा रुथ प्रभूने नुकताच नाग चैतन्यपासून घटस्फोट घेतला आहे.
याशिवाय तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

 

ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या चाहत्यांनाही याची खूप उत्सुकता असते.

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu Number One Actress | samantha ruth prabhu number one researched actress pushpa the rise actress defeated alia bhatt katrina kaif deepika padukone to be number one

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut |  ‘…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते’ – संजय राऊत

 

Maharashtra Political Crisis | ‘आम्ही सरकार पाडणार नाही, पण…’; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं

 

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट ? पुढील प्लान आखल्याची चर्चा