Samantha Ruth Prabhu | अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ला समांथा रुथ प्रभूचा नकार; समोर आले खरे कारण

पोलीसनामा ऑनलाइन टीम : Samantha Ruth Prabhu | साउथ चित्रपट सृष्टीतील ‘पुष्पा’ हा चित्रपट आजही लोकांना आठवतो. तर प्रेक्षक ‘पुष्पा 2’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात ‘ऊ उंटावा’ या आयटम साँग मधून समांथाने पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावले होते. समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आता अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 मध्येही समंथा दिसणार असल्याची चर्चा चालू होती. मात्र समांथाने पुष्पा 2 ची ऑफर नाकारल्याची माहिती समोर आली आहे. (Samantha Ruth Prabhu)

 

पुष्पा 2 चित्रपटात समंथा पुन्हा दिसणार असल्याने चाहते आनंदीत झाले होते. मात्र आता समांथाच्या टीमकडून यावर खुलासा करण्यात आला आहे. दिग्दर्शक सुकुमार यांनी समांथाला पुष्पा 2 चित्रपटात आयटम साँगसाठी त्याचबरोबर चित्रपटात छोटी भूमिका साकारण्यासाठी विचारणा केली होती. मात्र समांथाने या दोन्ही गोष्टींना नकार दिला होता. तर समांथाने आयटम सॉंग करण्यासाठी तयार नसल्याचेही म्हटले आहे. (Samantha Ruth Prabhu)

 

समंथा पुष्पा-2 मध्ये 3 मिनिटांचे गाणे करणार होती. या 3 मिनिटांच्या गाण्यासाठी अभिनेत्रीला तब्बल 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती पण समंथाने ती नाकारली. कारण तिला करिअरच्या या टप्प्यावर विशेष आयटम साँग करायचे नाही आहे त्यामुळे तिने ह्या चित्रपटासाठी नकार दिला आहे. पुष्पा 2 बद्दल सांगायचं तर अल्लू अर्जुनच्या 41 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पा 2 ची एक छोटी झलक किंवा टीझर व्हिडिओ रिलीज केला जाईल.

आता समंथा पुष्पा 2 चित्रपटात दिसणार नसल्याने चाहते नाखुश झाल्याचे दिसत आहेत.
पुष्या चित्रपटातील या गाण्यात समंथा अल्लू अर्जुन सोबत डान्स करताना दिसत होती.
समंथाच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती आता तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेब सिरीजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
या वेब सिरीज मध्ये समंथा बॉलीवूड अभिनेता वरूण धवन सह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
याव्यतिरिक्त समंथाचे ‘शकुंतलम’ मधील लूकनेही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu rejected allu arjun pushpa 2 movie offer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा