Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभुने सांगितली आपली खरी हाईट तेव्हा आश्चर्यचकित झाले चाहते, म्हणाले – छोटा पॅकेट बडा धमाका, पहा Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, तिची लोकप्रियता मागील काही दिवसांपासून बॉलीवूड प्रेमींमध्ये सुद्धा खूप वाढली आहे. पुष्पा चित्रपटातील ’ओ अंटावा’ या गाण्यात दिसल्यानंतर हिंदी प्रेक्षकही समंथाच्या सौंदर्याचे चाहते झाले आहेत. समंथा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती अनेकदा नवीन पोस्ट शेअर करताना दिसते. समंथाची (Samantha Ruth Prabhu) प्रत्येक पोस्ट तिच्या चाहत्यांनाही आवडते. दरम्यान, तिचा एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय झाला आहे (Samantha Ruth Video).

 

 

समंथाचा हा व्हिडिओ तिच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये समंथा तिच्या उंचीबद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की समंथा तिच्या चाहत्याच्या एका प्रश्नाचे उत्तर देत आहे. एका युजरने तिला विचारले आहे की, ‘तुझी उंची किती आहे? हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे‘. या प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली, ‘माझी उंची जेमतेम 5.3 आहे. मोठ्या गोष्टी छोट्या पॅकेजमध्ये येतात‘. व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणे समंथा खूपच क्युट दिसत आहे. तिच्या सिंपल लूकमुळे चाहते घायाळ झाले आहेत. (Samantha Ruth Prabhu)

 

या व्हिडिओला हजारो लाईक्स आले आहेत, ज्यावर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका यूजरने लिहिले, ‘समंथाने स्वतःच म्हटले की मोठ्या गोष्टी छोट्या पॅकेजमध्ये येतात‘.
तर तिथे आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘उंची नव्हे काम महत्वाचे आहे‘.
दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘पण तू तर उंच दिसत आहेस‘. अशा प्रकारे लोक या व्हिडिओवर कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

Web Title :- Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu reveals her real height fans shocked video viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Court | पत्नीची देखभाल करणे कायदेशीर प्रकारे पतीची जबाबदारी, HC ने फेटाळली याचिका

 

EPFO | तुमच्या PF खात्यात किती पैसे टाकणार सरकार, जाणून घ्या हिशेब

 

Cyrus Mistry Death | टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन