पवन सिंह किंवा खेसारी लाल नव्हे तर ‘या’ स्टारच्या ‘होळी साँग’चा सोशलवर ‘धुमाकूळ’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – होळीसाठी एक आठवडा बाकी आहे. भोजपुरी इंडस्ट्रीत एक से बढकर एक होळी साँग रिलीज होताना दिसत आहेत. यातील काही गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. खास बात अशी की, भोजपुरी सुपरस्टार पवन सिंह आणि खेसारी लाला यादव नाही तर इतर सिंगर्सची गाणीही चाहत्यांना आवडताना दिसत आहेत. काही गाणी तर अशी आहेत जी अलीकडेच रिलीज झाली आहेत आणि त्यांनी पवन सिंह तसेच खेसारीच्या होळी साँगला खूप मागे टाकलं आहे. असंच एक गाणं आहे भोजपुरी सिंगर समर सिंह याचं जे सध्या झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे.

समर सिंहच्या या गाण्याचं नाव आहे प्रधान जी के घरे. समर सिंह आणि कविता यादव यांनी हे गाणं गायलं आहे. हे गाणं युट्युबवर रिलीज केल्यानंतर 5 दिवसांच्या आतच या गाण्यानं 40 लाख व्ह्युज मिळाले आहेत.

समर सिंह आणि कविता यादव ही हिट जोडी आहे. या दोघांचं गाणं सईया धरावेला थरेसर रिलीज होताच लोकांच्या तोंडावर दिसलं होतं. या गाण्यानं युपी बिहारच्या प्रत्येक गाण्यात आपली जागा बनवली होती. 10 महिन्यातच या गाण्यानं 14 कोटींहून अधिक व्ह्युज मिळवले होते.