तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी पकडले, सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुल जप्त, अल्पवयीनकडून मोबाईल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तडीपार केले असताना शहरात बिनधास्त फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी पकडले. कुणाल सोमनाथ रावळ (वय २६, रा. नाना पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर एकूण ८ गुन्हे दाखल असून त्याला गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी तडीपार केले होते.

समर्थ पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस कर्मचारी शाम सूर्यवंशी हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना रावळ हा खडीचे मैदान येथे आल्याची माहिती मिळाली. त्यावरुन हवालदार संतोष काळे, सुभाष मोरे, प्रशांत सरक, शाम सूर्यवंशी यांनी खडीचे मैदान येथे थांबलेल्या रावळ याला ताब्यात घेतले.

समर्थ पोलिसांनी सराईत गुन्हेगार अनिकेत ऊर्फ पावन्या ज्ञानेश्वर काळे (वय २२, रा. नाना पेठ) याच्याकडून १ गावठी पिस्तुल व काडतुस असा ३० हजार २५० रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस हवालदार सुशिल लोणकर, संतोष काळे, हेमंत पेरणे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना क्वार्टरगेटजवळ एक जण उभा असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरुन ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तुल व काडतुस मिळून आले. समर्थ पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायकलवरुन जाणाऱ्या मुलीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघा अल्पवयीन मुलांना समर्थ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केला आहे. पोलीस शिपाई सुभाष मोरे, शुभम देसाई यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला. त्यात ही जबरी चोरी येरवडा येथील चोरट्यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते व इतरांनी येरवडा येथून तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल जप्त केला आहे.

ही कामगिरी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, फरसखाना विभाग समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम गुन्हे यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विशाल मोहिते, हवालदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, शुभम देसाई, सुभाष मोरे, निलेश साबळे, सूर्यवंशी ,सचिन गोरखे,प्रमोद जगताप ,हेमंत पेरणे, सचिन पवार, सुमित खुट्टे, प्रशांत सरक,शीतल काळे , विठ्ठल चोरमले, शाम सूर्यवंशी,बेडगे, गायकवाड, वाल कुनडे, बालाजी कोटलापुरे ,यांनी केली आहे .