धुळे : सज्जन गडावरील श्रींच्या पादुका पालखीचे शहरात पुष्पवृष्टी करत भाविकांनी केले स्वागत

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – श्री समर्थ सेवा मंडळ (सज्जन गड) यांच्या वतीने सालाबादा प्रमाणे श्रींच्या पादुकांचा दौरा व भिक्षा फेरी आयोजन करण्यात येते. यंदा हि सालाबादा प्रमाणे श्री समर्थ सेवा मंडळ सज्जन गड येथून श्रींच्या पादुका व भिक्षा फेरी भ्रमंतीला सुरवात करण्यात आली.

विदर्भातून मार्गक्रमण करत समर्थ सेवेकरी मध्यप्रदेशात दाखल झाले. नंतर तेथून परत परतीचा प्रवास करत आज महाराष्ट्रत धुळे जिल्ह्यातील शिरपुरात दाखल होऊन सांयकाळच्यावेळी पादुका पालखी सोहळा देवपुरातील खान्देश कुलस्वामीनी एकविरा देवी मंदिरात आगमन झाले. यावेळी आठ वाजता आरतीच्या वेळी पालखी यात्रेचे स्वागत मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले. भाविकांनी श्री पादुकांचे दर्शनाचा लाभ घेतला. यानंतर पालखी सोहळा मोठा पुल- जुना आग्रारोड मार्गाने- मुख्य बाजार पेठ मार्गाने- गांधी चौक – फुलवाला चौक- असा आला. श्रीराम मंदिरा जवळ पालखी सोहळ्यावर झेंडु फुलांची पुष्पवृष्टी भाविकांनी केली. यानंतर शहरचौकी पाचकंदिल चौक – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा -अग्रसेन चौक – रामवाडी मार्गाने मालेगावरोड येथील श्री समर्थ रामदास स्वामींचे मंदिरात पादुकांचे सुवासिनी महिलांनी पुजन करुन पुष्पवृटी करुन स्वागत केले. मंदिरात श्लोक वाचन करुन आरती करण्यात आली. भाविकांनी पादुकांचे दर्शनाचा लाभ घेतला. पालखी यात्रेचा येथील मंदिरात मुक्काम आहे.

शुक्रवारी सकाळी आठ ते अकरा वाजे पर्यत मालेगाव रोड, अभय नगर, राजवाडे नगर पवन नगर या भागातून समर्थ सेवेकरींची प्रभातफेरी आहे. योगेश बुवा रामदासी सह तीस ते चाळीस रामदासी व समर्थ भाविक सहभागी होणार आहे. यावेळी फेरी परिसरातून मार्गस्थ होताना नागरीकांनी यथाशक्ती दान करावे असे आव्हान करण्यात आले आहे.

याच पालखी सोहळ्यातून जमा केलेल्या धान्य द्रव्यांतून सज्जन गडावरील भंडाराचा लाभ भाविक घेतात. दुपारी अकरा वाजता आरती आटोपल्यावर पुढील प्रवास करत पुणे, सातारा मार्गाने पादुका पालखी सोहळा सज्जन गडाकडे जाणार आहे. अशी माहिती मंदिराचे विश्वस्त शरदजी कुबेर यांनी दिली. यावेळी प्रा. देवेंद्रजी डोंगरे, डॉ.सचिन चिंगरे, राजु महाराज तसेच महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/