सर्व शिक्षा अभियानाचा आणखी एक वाद; समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरू 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रसिद्ध केलेली पुस्तके वादात अडकत चालली आहेत. या पुस्तकांमधून छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम यांची बदनामी झाल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. असे असताना आता आणखी एक वाद समोर आला आहे. इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत रामदास यांचा कधीही संबंध आला नसताना तसे दाखवण्याचा प्रयत्न या पुस्तकातून होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9d3abbb-cf68-11e8-aaa2-bf1c632e5aa3′]

राज्य शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत छत्रपती शिवाजी राजा या नावाचे प्र. ग्र. सहस्त्रबुद्धे यांनी पुस्तक लिहिले आहे. यापुस्तकात शिवाजीराजे आणि संभाजीराजे यांचा संत रामदास यांच्याशी संबंध जोडण्यात आल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. राज्यातील १ लाख २० हजार शाळेमध्ये प्रत्येकी साडेचारशे पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. यातील ९० टक्के पुस्तकांमध्ये इतिहास आणि बहुजन महापुरुषांचा इतिहास विकृत करण्याचा घाटच सरकार व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घातला आहे. हा सगळा आरएसएसचा अजेंडा राबवला जात आहे. या सगळ्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. प्रशासनामधील शिक्षण आयुक्त, सर्व शिक्षण विभाग प्रमुख आणि पुस्तकाला मान्यता दिली ते सर्व अभ्यासक, या सर्वांचे या प्रकरणामध्ये हात ओले झाले आहेत. फक्त आर्थिक गणित जुळवण्यासाठी महापुरुषांच्या इतिहासाचे बाजारीकरण करण्यात येत आहे, असा आरोप ब्रिगेडने केला आहे.

शरद पवारांकडून पुन्हा मोदी सरकारचे कौतूक

महाराष्ट्रासमोर संभाजी ब्रिगेडने दोन पुस्तकांचा उलगडा केला आहे. अशी पुस्तके आणखी असतील तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची जबाबदारी स्वीकारावी. या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक मान्यता देणारे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावा. विनोद तावडे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या वादामुळे शिक्षण विभागाचे सर्व शिक्षा अभियान संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न या अभियानातून सुरू असल्याचा आरोप होऊ लागला आहे. संभाजी महाराजांबद्दल तर अतिशय अवमानकारक उल्लेख या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. तसेच संत तुकाराम महाराजांबद्दलही असेच लिखाण करण्यात आले आहे. आता तर छत्रपती शिवरायांबाबत चूकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.

[amazon_link asins=’B0748FCR4X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1e16fde-cf68-11e8-b2ce-3f50aadce05b’]