समर्थ योजनेतून केंद्र सरकार ‘या’ 18 राज्यातील 4 लाख लोकांना देणार रोजगार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडीत कामात कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने समर्थ योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत १८ राज्यातील चार लाख लोकांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी एका कार्यक्रमादरम्यान वस्त्र मंत्रालय आणि राज्यसरकारमध्ये झालेल्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी करण्यात आली.

वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यावेळी उपस्थित होत्या. इराणी म्हणाल्या, एकाच छताखाली सरकारने १८ राज्यातील नागरिकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. या करारावेळी जम्मू-काश्मीर आणि ओडिसा वगळता इतर राज्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. अरुणाचल प्रदेश, जम्मू- कश्मीर, केरळ, तामिळनाडू, तेलंगाना, आंध्रप्रदेश, आसाम, मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, हरियाणा, मेघालय, मणिपुर, झारखंड, उत्तराखंड, ओडिसा आदी राज्यातील कामगारांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणानंतर सर्व लाभार्थ्यांना वस्त्रक्षेत्राशी निगडीत कामांमध्ये नोकरीच्या संधी दिल्या जातील. यात तयार कपडे, विणकाम, हस्तकला, हातमाग आणि कार्पेटशी संबंधित प्रशिक्षण देण्यात येईल.

ईराणी म्हणाल्या, कौशल्य प्रशिक्षणानंतर लाभार्थ्यांना नोकऱ्या देण्यात येतील. भारतातील अजीवीकेची इच्छा असणारा प्रत्येक नागरिक कुशल असणे आवश्यक आहे. वस्त्र क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ७५ टक्के, तर मुद्रा योजनेतही ७० टक्के महिला लाभार्थी आहेत. करारावेळी उपस्थित राज्याच्या प्रतिनीधींना महिलांना जिल्हानिहाय शिवणकामाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. तर वस्त्र सचिव रवी कपूर म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा वस्त्रोद्योगात वाटा फार कमी आहे आणि त्यामुळेच वस्त्रोद्योग क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या संधीही जास्त आहेत. या उद्योगात सोळा लाख कुशल कामगारांची कमी आहे. समर्थ योजनेच्या अंतर्गत येत्या तीन वर्षात दहा लाख लोकांना प्रशिक्षित करण्याचा मानस आहे.

आरोग्यविषयक वृत्त –