बिहारमध्ये पुन्हा आस्मानी संकट, वीज कोसळल्याने 25 लोकांचा मृत्यू

पटणा : पोलीसनामा ऑनलाइन  –  बिहारमध्ये पुन्हा एकदा वीज कोसळण्याच्या घटनेने कहर केला आहे. गुरुवारी वीज कोसळल्याने वेगवेगळ्या जिल्ह्यात 25 लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये पटणामध्ये 9, समस्तीपुरमध्ये 8, पूर्व चंपारणमध्ये 4, शिवहर आणि कटिहारमध्ये 2-2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अधिकृत आकड्यांमध्ये 14 लोकांच्या मृत्यूला दुजोरा मिळाला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार पटणा जिल्ह्यात 5 तर मोतिहारीमध्ये 4, शिवहरमध्ये 2 आणि समस्तीपुरमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पटणा जिल्ह्यात 9 लोकांचा मृत्यू

पटणाच्या दुल्हिन बाजारमध्ये5 लोकांवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटना सरकुना, सोरामपुर, जीआयडी गावात घडली आहे. येथील बडकी खरवां आणि सोरामपुरचे दोन लोक जखमी झाले आहेत. जखमी लोकांवर दुल्हिन बाजार रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच बिहटामध्ये 3 व्यक्तींचा बळी गेला आहे, तर दानापुरमध्ये सुद्धा वीज पडल्याने एका मुलांचा मृत्यू झाला आहे.

समस्तीपुरमध्ये 8 लोकांचा मृत्यू

समस्तीपुरमध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे रोसराच्या बटहामध्ये 3, पूसाच्या मोरसंडमध्ये 1, समस्तीपुरच्या राजखण्डमध्ये 1, मुसरीघरारीच्या लाटबेसपूरामध्ये 1, विभूतीपूरच्या खासटभकाच्या वार्ड 8 मध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. येथे रोसराच्या बटहामध्ये 3, पूसाच्या मोरसंडमध्ये 1, समस्तीपुरच्या राजखण्डमध्ये 1, मुसरीघरारीच्या लाटबेसपूरामध्ये एक, विभूतीपुरच्या खासटभका वार्ड 08 मध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दलसिंहसरायच्या पांडमध्ये एकजण जखमी झाला आहे.

पूर्व चंपारण-शिवहरमध्ये 6 मृत्यू

तर पूर्व चम्पारणमध्ये वीज कोसळल्याने 4 लोकांचा मृत्यू झाला. बंजरियाच्या अजगरवा आणि आदापुरच्या कटगेनवामध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पताहीच्या परसौनी कपूरमध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बनकटवाच्या कोदरकटमध्ये सुद्धा एकाचा मृत्यू झाला. शिवहरमध्ये वीजेमुळे 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील तरियानीच्या छपरा आणि माधोपुर छाता गावात शेतात काम करत असताना ही दुर्घटना घडली.

कटिहार जिल्ह्यात दोन लोकांचा मृत्यू

कटिहारमध्ये वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला तर एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना कोढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विनोद पुर गावात घडली आहे. घटनेबाबत सांगितले जात आहे की, हवामान खराब असताना सजेनुर खातून, रजिया खातून आणि मोहम्मद मोतिन शेतात काम करत होते. या दरम्यान वीज कोसळल्याने हे लोक शेतातीलच मोटर रूमच्या जवळ आले होते, परंतु तेथे सुद्धा वीज कोसळल्याने दोन महिल्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मोहम्मद मतीन यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.