संभाजी भिडे पुन्हा न्यायालयीन सुनावणीस गैरहजर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

आंबे खाल्ल्याने मुले होत असल्याचा वादग्रस्त दावा करणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे पुन्हा एकदा न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिले.आता १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीस भिडे यांनी हजार रहावे, असे समन्स नाशिक न्यायालयाकडून बजावला जाणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5c037bd8-c3e1-11e8-9af3-3db9f8fce574′]

नाशिकमध्ये १० जून रोजी झालेल्या कार्यक्रमात भिडे यांनी माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी केली. त्यात तथ्य आढळून आल्याने आरोग्य विभागाने त्यांना हजर राहण्याची नोटीस बजावली. त्यास भिडे हजर राहिले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात भिडे यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने भिडे यांना हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, ते हजर राहिले नाहीत. अखेर २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणी हजर रहावे, असा समन्स न्यायलयाकडून बजावण्यात आला. पण, भिडे गैरहजर राहिल्याचे दिसून आले. आता या प्रकरणी १२ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी भिडे यांनी हजर रहावे, असे समन्स न्यायालयाकडून बजावला जाणार आहे

[amazon_link asins=’B00PQKR85E,B00JJIDBIC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68127d29-c3e1-11e8-9a82-f74dd36bfe27′]

संभाजी भिडे यांनी नाशिकच्या व्याख्यानादरम्यान, एक चमत्कारीक विधान केलं होत . माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत १८० जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा भिडे गुरूजी यांनी केला होता. त्यासंदर्भात आरोग्य विभागाने त्यांना हजर राहण्याची नोटीस बजावली.

जाहिरात

[amazon_link asins=’B014CLL3KS,B079GXD2WB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94550e18-c3e1-11e8-ae2b-2562224c2431′]