‘त्या’ वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे दोषी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन

माझ्या शेतातील आंबा  खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते असे अजब गजब विधान करणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे नाशिक महापालिकेच्या प्रसुतीपूर्व गर्भलिंग  निदान चाचणी समितीच्या चौकशीत दोषी आढळले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने समिती स्थापन करून, संबंधित प्रकरणाची चौकशी  केली होती.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’71489fb9-86a9-11e8-8780-65093fb5f991′]

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  या वक्तव्यानंतर काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेने संभाजी भिडेंना या प्रकरणात नोटीसही पाठवली होती. मात्र भिडेंनी नाशिक महापालिकेने पाठवेलली नोटीस स्वीकारली नव्हती. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी समितीच्या चौकशीत संभाजी भिडे दोषी आढळल्याने, आता समिती भिडेंविरोधात न्यायालयात जाऊन आपला अहवाल सादर करेल. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत असलेल्या कलम-२२ चा भिडेंनी भंग केल्याचा दावा या समितीने केला आहे. त्यामुळे आता संभाजी भिडे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते भिडे गुरुजी

“भिडे गुरूंजींनी नाशिकच्या व्याख्यानादरम्यान, एक चमत्कारीक विधान केले होते. माझ्या शेतातला आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते. आजपर्यंत 180 जोडप्यांनी हा आंबा खाल्ला असून, त्यापैकी दीडशे जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा भिडे गुरूजी यांनी केला होता ”
[amazon_link asins=’B06Y66GKGN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’76c83f3e-86a9-11e8-8986-7505f0eea9db’]

सोशल मीडियावर भिडेंच्या वक्तव्याची खिल्ली

संभाजी भिडे यांच्या या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात होती. आंब्याचा आधार घेत विनोदांचा वर्षाव अनेक दिवस सुरु होता . फेसबुक वर तर भिडेंच्या विनोदाचा पाऊस पडत होता. राजा ठाकरे यांनी देखेल या आंब्यांच्या वक्तव्यावरून व्यंगचित्र काढले होते.