Sambhaji Bhide | समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका, संभाजी भिडेंचे परखड मत

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याकडे नको इतके पुतळे, समुद्रात स्मारक असे म्हणत कोट्यवधी रुपये खर्च करुन समुद्रात स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करु नका असे शिवप्रतिष्ठानचे (Shiv Pratisthan) संस्थापक संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रात उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी कोरडे ओढले. भीमाशंकर (Bhimashankar) ते शिवनेरी (Shivneri) धारातिर्थ गडकोट मोहिमेची सांगता झाली. त्यावेळी ते जुन्नर येथे बोलत होते. 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान पदयात्रा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो धारकरी सहभागी झाले होते.

 

यावेळी मोहिमेत सहभागी झालेल्या धारकऱ्यांना संबोधित करताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले, हिंदू म्हणून जगायचं असेल तर शिवाजी-संभाजी हे मृत्युंजय मंत्र जपावे लागतील. सरकारे सारखी उलथीपालथी होत आहेत, हा त्यांचा धंदा आहे, ते दोन्हीही आपलेच, हिंदुत्वाचे (Hindutva) ठेकेदार, जुने आणि नवे सगळे जे आहेत ते देखावे असे म्हणत त्यांनी सरकार बदलण्याच्या घटनांवर निशाणा साधला.

 

ते पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांनी (Shivaji Maharaj) 289 लढाया तर संभाजी महाराजांनी (Sambhaji Maharaj) 134 लढाया लढल्या, हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व दिले, त्यांचे स्मरण करण्यासाठी मिरवणूक, उत्सव सोहळे करुन चालणार नाही. तर शिवाजी-संभाजी हे होकायंत्र समजून त्यांच्या विचारानुसार वागून, हिंदूस्थानची धारणा रक्तात भिनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहिजेत असे संभाजी भिडे गुरुजींनी सांगितले.

धर्मवीर बलिदान मास पाळा
संभाजी महाराजांचे बलिदान अत्यंत क्लेशदायक होते. हिंदुत्वासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी यंदाच्या वर्षापासून धर्मवीर बलिदान मास पाळण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या काळात गादीवर झोपणे नाही, चप्पल घालायची नाही, शुभकार्याला जायचे नाही. याचे पालन करण्याचे आवाहन संभाजी भिडे यांनी केले.
विना वल्गना राष्ट्र जागे करा, हा मंत्र शिवाजी महाराजांनी दिला आहे.
राष्ट्रकार्यात पुढे येण्यासाठी जाहिरात नको, की बोबाबोंब नको,
हे अंगीकारुन राष्ट्र जागे करण्याचे आव्हान धारकऱ्यांनी पेलावे, असे आवाहन संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना केले.

 

Web Title :- Sambhaji Bhide | sambhaji bhide oppose shivaji maharaj memorial in arabian sea mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Budget 2023 | ‘हा तर महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार..;’ केंद्रीय बजेटवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची टीका

Kolhapur Police Inspector / API Transfer | कोल्हापूर पोलीस : 18 पोलीस निरीक्षक आणि 5 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Pune By Elections | कसब्याची जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच! इच्छुकांची मोठी यादी