संभाजी भिडे वारी सोहळ्यात सहभागी होणार 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

संभाजी भिडे गुरूजी या वर्षी देखील वारी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे पुण्यातीस स्वंयसेवक प्रशार मोने यांनी दिली आहे. आज (शनिवार) रोजी संभाजी भिडे गुरूजींचे आगमन 2 वाजता पुण्यात होणार असून, दुपारी 3.30 च्या सुमारास गुरूजी आपल्या स्वयंसेवकासह जंगली महाराज रोड या ठिकाणी जमणार आहेत. त्यानंतर संभाजी भिडे संचेती हाॅस्पिटल पुलापासून ते डेक्कन येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालखीत सहभागी होणार आहेत.
[amazon_link asins=’B0728GFX26′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac0e7cfe-81be-11e8-931b-f93f4c232930′]

दरम्यान, मागील वर्षी देखील संभाजी भिडे गुरूजी आपल्या धारकऱ्यासह पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी दिंडीत तलवारी नाचवल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या वर्षी पोलिसांनी अगोदरच संभाजी भिडे यांना आपल्या धारकऱ्यांसह  तलवार व भाले घेऊन  पालखी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही असे म्हटले आहे.