विधानसभा 2019 : संभाजी ब्रिगेडकडून 15 जणांची तिसरी यादी जाहीर, पुणे शहर व जिल्ह्यातून 9 जणांना उमेदवारी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – आज पर्यंत दुसऱ्यांसाठी लढलो आता स्वत: साठी लढायचे यासाठी संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आज (मंगळवार) संभाजी ब्रिगेडने 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून राज्यभरात आत्तापर्यंत 50 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. महायुती, महाआघाडीसह वंचित, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आमची चर्चा सुरु असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंत भानुसे यांनी दिली.

आज औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 15 जणांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळाले असून शेती, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या मुद्यावर आमचा भर असणार असल्याचे भानुसे यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. अविनाश औटे, राहुल भोसले, राम भगुरे, वैशाली खोपडे, रेणुका सोमवंशी, बाळासाहेब दाभाडे, रेखा वहाटुळे, रवींद्र वहाटुळे उपस्थित होते.

आज जाहीर केलेल्ये तिसऱ्या यादीमध्ये रणजित भुपेंद्र तिडके (अमरावती), विशाल दत्ता शिंदे (किनवट-माहूर, जि. नांदेड), सोनाली उमेश ससाने (कोथरुड, पुणे), डॉ. नीता अशिष पाटील (कल्याण पश्चिम), चंद्रशेखर ज्ञानेश्वर घाडगे (शिरुर हवेली, पुणे), प्रशांत राजेंद्र पवार (इंदापूर, पुणे), विनोद शिवाजी जगताप (बारामती, पुणे), जीबन बापू शेवाळे (पुरंदर, पुणे), संतोष बाळासाहेब शिंदे (पर्वती, पुणे), शिवाजी उत्तम पवार (हडपसर, पुणे), राहुल मारोती वायकर (बीड), रमीज रशीद मुजावर (कागल, कोल्हापूर), प्रकाश रायभान पारखे (वडगाव शेरी, पुणे), राजू गुलाबराव मोरे (परतूर-मंठा, जालना), तौसिफ अब्बास शेख (कसबा, पुणे) यांचा समावेश आहे.

Visit : policenama.com