लोकसभा 2019 : तर संभाजी ब्रिगेड स्वबळावर निवडणूकीच्या रिंगणात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कॉग्रेसला आघाडीसंदर्भात निमंत्रण दिले होते. परंतु आठ ते दहा दिवसात निर्णय नाही झाल्यास संभाजी ब्रिगेड स्वबळावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लढणार आहे. त्यानंतर राज्यातील उमेदवारांची यादी येत्या आठ ते दहा दिवसांत जाहिर करण्यात येईल अशी घोषणा प्रवक्ते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. शिवानंद भानुसे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

यासंदर्भात २६ फेब्रुवारी रोजी आढावा बैठक घेण्यात येणार असून पुण्यातूनही उमेदवार इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ९ डिसेंबरला संभाजी ब्रिगेडचा स्वराज्यसंकल्प मेळावा औरंगाबाद येथे पार पडला. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना आघाडीसाठी निमंत्रण दिले होते. त्यासाठी काही बैठकाही झाल्या. आमच्या काही मागण्या त्यांनी मान्य केल्या आहेत. मात्र अजून निर्णय झालेला नाही. मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी करायला आम्ही तयार आहोत. परंतु संभाजी ब्रिगेडचा अजेंडा व काही अटी-शर्ती कॉंग्रेसने मान्य केल्या तर आघाडी होऊ शकते अन्यथा आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू आणि याचा कोणाला फायदा किंवा तोटा होईल याचा विचार केला जाणार नाही. असे भानुसे म्हणाले.

राज्यासह देशातील कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, छोटे मोठे व्यावसायिक, लघु-मध्यम व्यापारी, सामान्य नागरिक, मुकबधीर, कर्णबधीर यांना उध्वस्त करण्याचे काम मोदी, फडणवीस आणि ठाकरे सरकाने केलेले आहे. मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षमाचं नुसतं गाजर दाखवण्यात आले. खऱ्या आणि हक्काच्या मागणीपासून पाच वर्षे समजाला वंचित ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने कुठलेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत. अपयशी ठरलेले हे निष्क्रीय सरकार आहे. त्यामुळे एक स्वच्छ आणि चांगला पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेड ची भुमीका २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत महत्त्वाची आहे. म्हणून लोकसभा निवडणूकांमध्ये संभाजी ब्रिगेडकडून निवडणूका लढविण्यासाठी पाऊल उचलले गेले आहे.

#Surgicalstrike2 : सौगंध इस मिट्टी की, मैं देश नही मिटने दूँगा ! राजस्थानमध्ये मोदींचा पुन्हा एल्गार

देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न, दारुबंदी, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार, महागाई, झोपडपट्टी विरहित शहरं, २४ तास पाणी पुरवठा, चांगले रस्ते, वाहतुक सेवा, धर्मनिरपेक्ष समाज या मुलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शंभर टक्के समाजकारण आणि राजकारण संभाजी ब्रिगेडकडून करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. शिवानंद भानुसे, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, हवेली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, संघटक संजय चव्हाण, उपाध्यक्ष नितीन शिंदे, अजय पवार, सुरेखा जुजगर, जयकर कदम, पांडुरंग पाटील, पूजा झोळे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.