संभाजी ब्रिगेड निवडणूक मैदानात ; ‘या’ जागांवर उतरवणार उमेदवार

पुण्यात संभाजी ब्रिगेडकडून विकास पासलकर किंवा संतोष शिंदे यांना उमेदवारी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – संभाजी ब्रिगेडने लोकसभा निवडणूकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी ९ मतदारसंघ निवडले असून तेथील उमेदवारही जाहीर केले आहेत. तर इतर ठिकाणी आघाडी व युती सोडून जे इतर सेक्युलर उमेदवार उभे आहेत त्यांना पाठींबा देणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेवून सांगितले.

संभाजी ब्रिगेड माढा, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. तर जे उमेदवार शेतकरी, बेरोजगार, युवक महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतीमालाला हमीभाव आणि दारुमुक्त गाव याबाबत भूमिका घेतील, त्यांना संभाजी ब्रिगेड बिनशर्त सहकार्य करेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

तसेच हे ९ मतदारसंघ सोडून ज्या ठिकाणी आपला उमेदवार नाही त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना यांना सोडून इतर सेक्युलर उमेदवारांना सहकार्य करणार आहे. आतापर्यंत चार प्रस्थापित पक्षांनी आलटून पालटून सत्ता उपभोगली आहे मात्र, सर्वसामान्यांचे जीवन-मरणाचे प्रश्न त्यांनी कधीच सोडवले नाहीत, असेही यावेळी संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

संभाजी ब्रिगेडचे उमेदवार
भिवंडी :- संजय काशिनाथ पाटील
जालना :- श्याम रुस्तुमराव शिरसाट
माढा :-विश्वंभर नारायण काशीद
रावेर :- रवींद्र दंगल पवार
उस्मानाबाद :- इंजि. नेताजी गोरे
पुणे :- विकास पासलकर/संतोष शिंदे
सोलापूर :- श्रीकांत मस्के
शिरुर :- शिवाजी उत्तम पवार

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like