संभाजीराजेंनी संसदेत उठवला मराठ्यांचा आवाज!

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभर शांततेत सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. राज्यभर गाड्यांची तोडफोड सुरू असून अनेक आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा मुद्दा लोकसभा आणि राज्यसभेतही गाजत आहे. आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही हा मुद्दा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासमोर मांडला.
[amazon_link asins=’B01LYX1JJL’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7b5c2676-8f37-11e8-a3b1-73182fa40462′]

आज खासदार धनंजय महाडिक आणि विनायक राऊत यांनीही लोकसभेत या मुद्यावर प्रकाशझोत टाकला. याच दरम्यान, राजर्षी शाहू महाराजांनी सर्वात आधी आरक्षण दिले होते. 1902 मध्ये शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. त्यात एससी, एसटी,ओबीसी यासह मराठा समाजाचाही समावेश होता, असे संभाजीराजे म्हणाले.

स्वातंत्र्यानंतर यातून मराठा समजला वगळण्यात आले. यामुळेच मराठा बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. गेल्या 3 वर्षात त्यांनी शांततेत मोर्चे काढले. त्या मोर्चाचे कौतुक जगभरात झाले. यामुळेच मराठा समाजातील बांधवांना बोलावून चर्चा करावी. त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. तसेच शांततेत सुरू झालेल्या या मोर्चात कोणतेही राजकारण न आणता या मुद्द्यावर तोडगा काढला, असेही संभाजीराजे म्हणाले.
[amazon_link asins=’B006526G50′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’818a07a9-8f37-11e8-8a05-5da5df8e2c67′]

संभाजीराजे यांचे हे भाषण संपताच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर भाष्य केले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य आहे. पण, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपराष्ट्रपतींनी केला.