Sambhaji Patil Nilangekar | संभाजी पाटील निलंगेकरांचा देशमुखांच्या भाजप प्रवेशाला विरोध, म्हणाले – ‘… म्हणून लातूरच्या प्रिन्सची भाजपात येण्याची इच्छा’

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Alliance Government) कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपने (BJP) युती करुन सरकार स्थापन केले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकारणात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख (Congress MLAs Amit Deshmukh) आणि धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर आता माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लातूर भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपमध्ये अनेकजण प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यात लातूरच्या प्रिन्सची सुद्धा इच्छा झाली आहे. पण लातूरमध्ये ऑक्सिजन नव्हतं तेव्हा प्रिन्स शहराबाहेर होते. आता सत्तेवर राहण्यासाठी आणि आपण केलेली चुकीची कामे लपवण्यासाठी भाजपमध्ये यायचं म्हणत आहेत. परंतु हे काय येत नाहीत आणि आम्ही काय घेत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला प्रिन्स नको, तर सर्वसामान्य कार्यकर्ता भाजपमध्ये हवा. ते पक्षात आलेलं भाजप कार्यकर्त्यांना बिलकुल रुचणार नाही, असं म्हणत संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी देशमुख बंधूंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे.

लातूर महापालिका निवडणुकीसंदर्भात (Latur Municipal Election) बोलताना पाटील म्हणाले, जे कार्यकर्ते 35 वर्षाच्या आतील आहेत. त्यांनी निवडणुकीची तयारी करावी. महापालिकेच्या 80 टक्के जागांवर 35 वर्षाच्या आतील कर्यकर्त्यांना संधी दिली जणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, येत्या काही दिवसात भाजपमध्ये अनेक मोठ मोठे नेते येणार आहेत, महाविकास आघाडीतील नेत्यांचा
पूर्ण पक्ष रिकामा होईल, शिवसेनेचे (Shivsena) अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत,
प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष
चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी औरंगाबादमध्ये केला आहे.

Web Title :- Sambhaji Patil Nilangekar | bjp leader sambhaji patil nilangekar on amit deshmukh join bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RRR Movie | RRR या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान जरी हुकला तरी ‘नाटू नाटू’ने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावत रचला इतिहास

Taapsee Pannu | ‘हसीन दिलरुबा’ या चित्रपटाच्या सिक्वेलचे पोस्टर तापसीने केले शेअर; प्रेक्षक झाले आतुर