कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर कामगारांच्या नावाखाली आपल्या कार्यकर्त्यांना लाभ पोहचवत असल्यानं खळबळ !

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री निलंगेकरांच्या हस्ते बांधकाम कामगारांना लाभ वाटपांचा सोहळा आहे. मात्र यात लाभार्थी कामगार नसून भलतेच जण असल्याचं समोर येत आहे. यात भाजपाचे कार्यकर्ते देखील असल्याचं बोललं जातंय. पोलीसनामाच्या प्रतिनिधीने एका स्थानिक व्यक्तीशी चर्चा केल्यानंतर ही बाब समोर येत आहे.

कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगारांना विविध सुविधा व लाभ प्राप्त होतात. साहित्यासाठी प्रत्येक कमगराला पाच हजार रुपये देण्यात येणार असल्याचे बोललं जातंय. नोंदणीकृत झालेल्या इमारत व बांधकाम कामगारांना मंगळवार  रोजी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लाभ वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. मात्र यात लाभार्थी म्हणून बांधकाम कामगार यांच्यासोबत इतरही व्यक्ती आणि भाजपा चे कार्यकर्ते देखील असल्याची खळबळ जनक चर्चा सध्या लातूर जिल्ह्यात आहे. कामगार मंत्री या योजनेचा लाभ बांधकाम कामगार यांच्या नावाखाली इतरांना तसेच भाजपा च्या कार्यकर्त्यांना पोहचवत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

फिल्मी स्टाईलने सराईत गुन्हेगाराचे पलायन ; पोलीसांची धावपळ 

संभाजी पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे कामगार मंत्री तसेच भूकंप पुनर्वसन मंत्री आहेत. लातूर चे पालकमंत्री आहेत. निलंगा येथून त्यांनी निवडणूक लढली आहे. पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळालं.