×
Homeताज्या बातम्याSambhaji Raje Bhosale | रायगडावर पिंडदान विधी : संभाजीराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना...

Sambhaji Raje Bhosale | रायगडावर पिंडदान विधी : संभाजीराजे भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले – अशा विधीला परवानगी…

मुंबई : Sambhaji Raje Bhosale | रायगड किल्ल्यावर (Raigad Fort) छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) समाधीसमोरच पिंडदानाचा विधी सुरू असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे. रायगडावर महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर विधीस परवानगी नसावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रायगड किल्ल्यावर शाक्त पद्धतीने शिवराज्याभिषेक (Shiva Rajya Abhishek) दिन शनिवारी साजरा झाला. राजसदरेवरील राज्याभिषेकाच्या कार्यक्रमानंतर संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) कार्यकर्ते आणि काही शिवप्रेमी हे महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेले असता तिथे पिंडदानाचा विधी सुरू असल्याचे आढळले.

संभाजी ब्रिगेडचे कोकण विभागीय अध्यक्ष सुर्यकांत भोसले (Suryakant Bhosale) व इतर शिवभक्तांनी पिंडदान करणार्‍या व्यक्तींना याचा जाब विचारला.
दरम्यान या प्रकाराची दखल छत्रपती संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांनी घेतली असून या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
हे पत्र त्यांनी ट्विटरवर सुद्धा शेअर केले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, दुर्गराज रायगडवर श्री शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस्थळी जो प्रकार घडला व गेल्या काही महिन्यांत काही लोकांनी संशयास्पद विधी केल्याचे आढळून आले आहे, याला अटकाव घालण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ कराव्यात.

पत्रात पुढे म्हटले आहे की, समस्त देशाचे शक्तीस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर गेल्या काही महिन्यात श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर काही संशयासप्द विधी केल्याचे आढळून येत आहे.
अशा प्रकारामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊन असंतोषाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

याकरिता, संपूर्ण दुर्गराज रायगडावर व विशेषत: राजसदर, शिवसमाधी परिसर, होळीचा माळ, बालेकिल्ला परिसर
याठिकाणी श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे विधी करण्यास अटकाव करण्यात यावा.
यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गृहविभाग व केंद्रीय पुरातत्व विभागास आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात व
तात्काळ व्यवस्था अंमलात आणावी, असे पत्रात म्हटले आहे.

Web Title :- Sambhaji Raje Bhosale | sambhajiraje chhatrapati letter to cm eknath shinde over raigad fort chhatrapati shivaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Champa singh Thapa | बाळासाहेबांच्या ‘सावली’नेही सोडली उद्धव ठाकरेंची साथ, ‘मातोश्रीचा सेवक’ शिंदे गटात

Pune Crime | लॉन्ड्री चालकाचा खून करुन मृतदेह फेकला डेक्कन परिसरातील नदीपात्रात, प्रचंड खळबळ

Fiber Rich Foods | जपानी लोकांसारखे दिर्घायुष्य हवे असेल तर खाण्यास सुरुवात करा ‘हे’ 6 सुपरफूड

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News