मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या कामाविषयी समाधानी असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांचं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation) राज्यभरात वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विविध ठिकाणी आंदोलने आणि विरोध प्रदर्शने देखील करण्यात आली होती. त्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे ( Sambhajiraje ) यांनी आता मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan) यांनी देखील मराठा आरक्षणासाठी योग्य ती कारवाई केलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कामाबद्दल मी समाधानी आहे, असं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे ( Vinayakk Mete) यांनी केला होता. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यामंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काल संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली आहे.

नुकताच महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. ओला दुष्काळ ( Wet drought) जाहीर केला तर केंद्राकडून अधिक मदत मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरा वेळी राज्य सरकारने केंद्राकडे 2800 कोटींची मागणी केली होती. परंतु त्यावेळी 900 कोटी ही आले की नाही याबद्दल शंका आहे. आम्ही केलेल्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे .त्याचबरोबर शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळण्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणावरुन मेटेंचा सरकारवर हल्लाबोल
सरकारवर टीका करताना मेटे यांनी टीका करताना अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे आरक्षणाचा गोंधळ वाढला आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप देखील शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला होता. अशोक चव्हाण यांच्या समितीकडून कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसून येत नाही. तसेच सरकारकडून यासाठी कोणतीही हालचाल होत नसल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. आरक्षणामुळे ॲडमिशन आणि नोकरभरती थांबलीथांबल्याने याला राज्य सरकार जबाबदार आरोप देखील विनायक मेटे यांनी केला होता.