Sambhaji Raje Chhatrapati | संभाजीराजेंचं उपोषण मागे, मागण्या मान्य झाल्याचं जाहीर (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – मागील तीन दिवसांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषणाला बसले आहेत. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांचा आजचा उपोषणाचा (Hunger Strike) तिसरा दिवस आहे. मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने आमरण उपोषणाला बसलेल्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं. सरकारच्या शिष्टमंडळाशी (Government Delegation) चर्चा केल्यानंतर संभाजीराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) म्हणाले, आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. मला आनंदानं सांगायचंय की, ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यासह इतर नेते उपोषण स्थळावर आले. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मलासुद्धा वाचवलं त्याबद्दल आभार मानतो.

 

 

 

 

शिष्टमंडळातील मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागण्या मान्य झाल्याचं जहीर केलं.

1. सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट 30 जूनपर्यंत तयार करणार

2. सारथीमधील रिक्त पद मार्च 2022 पर्यंत भरणार

3. आण्णासाहेब पाटील महामंडळाला अतिरिक्त 100 कोटींचा निधी देणार

4. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वसतीगृहांचे उद्घाटन करणार

 

Web Title :- Sambhaji Raje Chhatrapati | Sambhaji Raje’s fast back, demands accepted (video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा! ‘कोरोना’ची रुग्णसंख्या पन्नासच्या आत, गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Udayanraje Bhosale | ‘छत्रपती शिवाजी महारांजांचे गुरू रामदास स्वामी नव्हते, त्यांचे गुरू…’; उदयनराजेंनी सांगितला खरा इतिहास!

 

Amitabh Bachchan Health Update | अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत बिघाड, चाहत्यांच्या चिंतेत मोठी वाढ..