Jejuri News : छत्रपती संभाजीराजे यांच्या लग्नाचा आज वाढदिवस, राजेंनी जेजुरी गडावर उचलली खंडा तलवार (व्हिडीओ)

जेजुरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

कोल्हापूर गादीचे वंशज संभाजीराजे भोसले छत्रपती यांनी आज तिर्थक्षेत्र जेजुरीत येऊन कुलदैवताचे दर्शन घेतले. यावेळी संभाजीराजे यांनी खंडा तलवार उचलून दाखवली. खंडा तलवार उचलल्याचे त्यांचे फोटो आणि व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संभाजीराजे यांचा आज लग्नाचा वाढदिवस असल्याने ते जेजुरी येथे कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी आले होते.

 

संभाजीराजे हे पत्नी संयोगीताराजे यांच्यासह जेजुरीत कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी गडावर आले होते. लग्नानंतर त्यांनी जेजुरीस भेट दिली नव्हती. आज कुलदैवताचे दर्शन घेऊन कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी उरकले. त्यांचा हा संपूर्ण दौरा खासगी होता. त्यामुळे, साताऱ्यात आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या स्थापना कार्यक्रमात संभाजीराजे उपस्थित राहिले नाहीत.

42 किलो वजन असणारी खंडा तलवार मराठा सरदार महिपतराव आणि रामराव पानसे यांनी अडीचशे वर्षापूर्वी अर्पण केली होती. तेव्हापासून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा गडावर आला की ती उचलून धरण्याची स्पर्धा भरवली जाते. अशा प्रकारे मर्दानी खेळातून खंडोबाचे भक्त आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. आजही ही तलवार जेजुरी गडावर आहे.