Sambhaji Raje | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी राजे आक्रमक; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sambhaji Raje | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि औरंगजेब (Aurangzeb) यांच्यावर एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देत जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, मी माझ्या मतावर ठाम आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती आक्रमक झाले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीका केली असून त्यांनी त्यात जितेंद्र आव्हाड यांना इशारा देखील दिला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.’ असा इशारा त्यांनी (Sambhaji Raje) ट्वीटच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याव सत्ताधारी भाजप देखील चांगलीच आक्रमक झाली असून भाजपकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. भाजपने म्हटलं आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही जितेंद्र आव्हाड सारख्या विकृती महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलेल्या होत्या. स्वतःला पद, पैसा, सत्ता मिळणार असेल तर विचारधाराच काय, प्रसंगी धर्मांतर करून औरंगजेब चा वारस मीच आहे सांगण्यात देखील कमी करणार नाहीत. आव्हाड सारख्या विकृतीच्या तोंडून महान महापुरुषांची नावे येतात, त्यातून असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, जणू एक थोर समाजसेवकच बोलतो आहे. पण या विकृत वाणाची कथनी वेगळी आणि करणी वेगळी आहे.’ अशी टीका भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आली आहे.

नेमके काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

महाराष्ट्र सन्मान परिषदेत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक विधान केले होते.
ते म्हणाले होते की, ‘एमपीएससीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला आहे.
एके दिवशी तावडेंनी विधानसभेत सांगितलं होतं की, आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार.
मग मी म्हटलं की, मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का?
समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना.
शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत.
यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे.
‘ असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

Web Title :- Sambhaji Raje | sambhaji raje chhatrapati reaction on jitendra awhad statement regarding shivaji maharaj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…

Balasaheb Thorat | काँग्रेसचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर; काँग्रेसनेते बाळासाहेब थोरांत यांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा?

Kasba Constituency Bypolls | जाणून घ्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे शिक्षण आणि संपत्ती