VIDEO : …आणि खासदार संभाजी राजेंना पोहण्याचा मोह अनावर

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने कोल्हापूरमधील शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ खासदार संभाजी राजे गेले असता. तिथे असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली आणि संभाजी राजेंनाही पोहण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनीही नदीत उडी घेतली.

आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ खासदार संभाजी राजे चंदगड तालुका दौऱ्यावर होते. त्यावेळी धलगरवाडी येथून जात असतांना रस्त्यालालागून असलेल्या नदीत काही मुलं पोहतांना दिसली. त्यावेळी संभाजी राजेंनी गाडी थांबवून पहिले आणि त्यांनाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यावेळी कुठलाही विचार न करता त्यांनी नदीत उडी घेतली. विशेष म्हणजे, संभाजी राजेंच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मोह आवरला नसल्याने त्यांनी नदीत सूर मारला.

दरम्यान, ज्यांना भेटण्याची आणि त्यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा तरुणांमध्ये असते. त्यावेळी खुद्द संभाजी राजेंना राजेपण सोडून आपल्या सोबत पोहतांना पाहून तेथील तरुणांनाही आनंद झाला. आणि त्यांनीही राजेंसोबत पोहण्याचा आनंद लुटला. इतकेच नव्हे तर राजेंसोबत फोटोही काढले.

तब्बल अर्धा तास संभाजी राजेंनी तरुणांसोबत पोहण्याचा आनंद घेतला. इतकेच नव्हे तर, राजेंना पोहतांना पाहून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना सुद्धा पोहण्याचा मोह आवरला नाही. आणि त्यांनीही पाण्यात सूर मारला.