Sambhajiraje Chhatrapati | ‘हर हर महादेव’ चित्रपट टिव्हीवर दाखवला तर…, संभाजीराजेंचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘हर हर महादेव’ या सिनेमामुळे राज्यात मोठे वादंग निर्माण झाले होते. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच राज्यभरात या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले होते. हर हर महादेव चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनीही आक्षेप घेतला होता. सिनेमात इतिहासाचा विपर्यास झाल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला होता.

 

दरम्यान, या वादानंतर ‘हर हर महादेव’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर 18 डिसेंबर रोजी पाहता येणार आहे. झी मराठीवर हा सिनेमा 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता दाखवला जाणार आहे. तर आता सिनेमा टीव्हीवर दाखवण्यालाही संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या चित्रपटाचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

 

हर हर महादेव हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करु नका अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजे यांनी झी स्टुडिओजला लिहिले आहे. हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओज जबाबदार असेल, असं त्यांनी यामध्ये म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपतींच्या आक्रमक पवित्र्यामुळे सिनेमाचे टीव्हीवरील प्रसारण थांबेल का असा सवाल उपस्थित झाला आहे.

काय लिहिले पत्रात?
संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओज-मराठीचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी यांना शनिवारी (दि.3) पत्र लिहिले आहे.
त्यांनी या पत्रात असे नमुद केले आहे की, हर हर महादेव या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत चुकीच्या पद्धतीने सादरीकरण झाले असल्याने या चित्रपटाबाबत संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती. राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडण्यात आले होते.

 

या चित्रपटामुळे तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेलेल्या असताना देखील
हा वादग्रस्त चित्रपट तुम्ही झी मराठी या वाहिनीच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर प्रदर्शित करीत आहात.
शिवभक्तांच्या भावनांशी असा खेळ करणे योग्य नाही. सदरील चित्रपट टेलिव्हिजनवर प्रदर्शित करु नये,
असे स्वराज्य संघटना सूचित करीत आहे.
या सूचनेकडे कानाडोळा करुन हर हर महादेव हा चित्रपट टेलिव्हिजनवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर
परिणामांना सामोरे जावे लागेल व त्यासाठी पूर्णत: तुम्ही जबाबदार असाल, असा ईशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

 

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | If the movie ‘Har Har Mahadev’ is shown on TV…, Sambhaji Raj’s warning

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल

Railway IRME Exam-UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगावर मोठी जबाबदारी; आयोजित करणार रेल्वे भरतीच्या ‘या’ परीक्षा