Sambhajiraje Chhatrapati | ‘बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सर्वांना अधिकार’ – संभाजीराजे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Late Balasaheb Thackeray) यांचे नाव वापरु नका, तुमच्या बापाचे नाव वापरुन मत मागा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay) यांनी बंडखोर आमदारांना केले होते. यावर बोलताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी म्हटले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते आहेत. त्यांचं नाव घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं. बीडच्या गेवराई शहरातील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या (Cambridge International School) उद्घाटनावेळी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) बोलत होते. राज्यात बाळासाहेब ठाकरेंचं नाव वापरण्यावरुन राजकारण पेटले असताना संभाजीराजे यांनी या वादात उडी घेतली.

 

काय म्हणाले संभाजीराजे ?

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरु नका, तुमच्या बापाचे नाव वापरुन मत मागा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले होते. मात्र बाळासाहेब हे कुणा एकट्याचे नसून ते लोकनेते आहेत. त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार आहे, अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. ज्यांना कुणाला सरकार करायचं असेल, त्यांनी करावं मात्र शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवावेत, असंही संभाजीराजे म्हणाले.

 

एकीकडे सत्तास्थापनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात घमासान सुरु आहे.
तर दुसरीकडे राज्यात पेरणीचे दिवस आहेत,
मात्र अनेक ठिकाणी मुबलक पाऊस झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्यात.
असं असताना संभाजीराजे मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर पेरणी करताना दिसून आले.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | maharashtra political crisis sambhajiraje chhatrapati reacts on cm uddhav thackeray appeal to eknath shinde not to use balasaheb thackeray name

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा