Sambhajiraje Chhatrapati | कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात; हा कुठला न्याय?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि स्वराज्य संघटना पक्षांनी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. यावेळी अनेक आंदोलकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी उघड माथ्याने, काळे झेंडे दाखवणारे पोलिसांच्या ताब्यात, हा कुठला न्याय? असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी विचारले.

 

गेले काही दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपमानकारक वक्तव्य केल्याने भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा विरोधी पक्षांनी मागितला आहे. तसेच त्यांचा निषेधही केला जात आहे. त्यावरून आजचे आंदोलन झाले होते. या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आलेले होते. स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

यावेळी ‘राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या.
काळे झेंडे दाखवले म्हणून स्वराज्यच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले,
मग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून उघड माथ्याने कसे फिरत आहेत? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | pune swarajya workers shows black flag protest to governor bhagatsingh koshyari mp sambhaji chhatrapati reacts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत