Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजेंची मोठी घोषणा ! ‘…म्हणून मी राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhajiraje Chhatrapati | राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी (Sambhajiraje Chhatrapati) राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) अपक्ष लढवणार अशी घोषणा केली होती. यावरुन राज्यात मोठी चर्चा रंगताना दिसली. संभाजीराजे यांना शिवसेनेकडून (Shivsena) निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. मात्र संभाजीराजे यांनी कोणतेही प्रतिक्रिया न दिल्यानं अखेर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार फिक्स केला. यानंतर संभाजीराजे नेमकी कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून होते. यावर आज खुद्द संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत आपली मोठी भूमिका मांडली आहे.

 

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या खासदारकीचा तिढा अखेर सुटला आहे. संभाजीराजे यांनी आता आपण खासदारकीच्या निवडणुकीला सामोरं जाणार नसल्याची घोषणा केली आहे. यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ”सर्वप्रथम सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी केलं हे मी कदापी विसरु शकत नाही. सर्वपक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेवर पाठवावं असं वाटत होतं. ज्या आमदारांनी फॉर्मवर सह्या केल्या त्या सर्वांचे आभार मानतो. त्या आमदारांच्या आयुष्यभर मी पाठीशी राहील. केव्हाही त्यांनी हाक द्यावी संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेत असणार. शिवसेनेने मला ऑफर दिली आणि पक्षात प्रवेश करण्याची खासदारकी मिळवा. मी घेऊ शकलो असतो पण मी जाहीर केलं होतं की, मी जाणार नाही.”

पुढे संभाजीराजे म्हणाले, ”कालपासून अनेक आमदारांचे फोन आहेत. राजे.. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची. पण घोडे बाजार होणार… घोडेबाजारसाठी माझी उमेदवारी नाहीये. निष्कलंक माझं व्यक्तिमत्व आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये म्हणून मी उमेदवारी अर्ज भरणार नाही.” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

 

दरम्यान, ”या निवडणुकीच्या समोर मी जाणार नाही..पण ही माघार नाही तर माझा स्वाभिमान आहे. मी सर्व पक्षांना विनंती केली होती की, माझी कार्यपद्धती पाहून आपण सर्वांनी मला मदत करावी. माझी अजिबात कुणावरही नाराजी नाहीये. मी आता मोकळा झालो आहे. स्वराज्य संघटीत करण्यासाठी. मला कोणत्याही पक्षाचा द्वेष नाही. मी सुद्धा छत्रपतींचा मावळा आहे. माझी ताकद 42 आमदार नाहीत तर जनता असल्याचं,’ संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

 

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | rajya sabha election 2022 sambhaji raje said i will not contest election

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा