Sambhajiraje Chhatrapati | ‘राज्यसभा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच घेणार’ ! संभाजीराजेंचं पोस्टर व्हायरल; चर्चेला उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhajiraje Chhatrapati | संभाजीराजे छत्रपतींच्या (Sambhajiraje Chhatrapati) खासदारकीचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. शिवसेनेकडून (Shivsena) संभाजीराजेंना उमेदवारी देण्यासाठी पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. पण त्यांनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिला आहे. त्यानंतर शिवसेनेने संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संभाजीराजे यांना पाठिंबा नाकारल्यानंतर मराठा संघटना आणि संभाजीराजे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोणीही पाठिंबा जाहीर न केल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

यानंतर आता संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) समर्थकांनी एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. ”आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष 2024.” असा मजकूर लिहिला आहे. या दरम्यान आता संभाजीराजेंच्या भूमिकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. महत्त्वाचे म्हणजे संभाजीराजे अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ते ठाम राहणार का ? अथवा पुढची रणनीती काय असणार ? असे अनेक सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

 

दरम्यान, शिवसेनेकडे असलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचं नाव निश्चित आहे. तसेच, दुसऱ्या जागेसाठी संभाजीराजेंसोबत चर्चा सुरू होती. पण शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी संभाजीराजेंना पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. त्यांनी या अटीवर प्रत्यक्ष कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यानंतर काल (मंगळवारी) शिवसेनेने संजय पवार यांचे नाव जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | rajyasabha election 2022 sambhajiraje chhatrapati poster goes viral on social media

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा