Sambhajiraje Chhatrapati | ‘अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण!’ संभाजीराजेंनी गौतमी पाटीलला दिलेला पाठिंबा घेतला मागे; अचानक काय घडलं?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नृत्यांगना गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) हे नाव सध्या महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या तिच्या आडनावावरुन (Surname) नुकातच वाद निर्माण झाला आहे. गौतमीने पाटील आडनाव वापरु नये अशी भूमिका काही संघटनांनी घेतली होती. तर काही संघटनांनी पाठिंबा दिला होता. अशातच संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी नृत्य आणि पाटील आडनावाच्या वादावर भाष्य केलं होतं. महिला संरक्षणाचा मुद्दा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी उपस्थित केला.
https://www.facebook.com/photo?fbid=787408636089626&set=a.527880985375727
संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, कलाकारांना संरक्षण (Protection of Artists)
मिळाले पाहिजे, महाराष्ट्र हे वेगळं राज्य आहे. सर्वांनी महिलांच्या पाठीशी उभं राहायला हवं. तसेच गौतमी पाटीलला पाठिंबा देयला हवा, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले होते. मात्र, आता संभाजीराजे यांनी त्यांच्या या वक्तव्यावरुन मघार घेतली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर कर करत म्हटले की, ‘महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण !’
गौतमी पाटीलवरील आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट संभाजीराजे यांनी फेसबुकवर शेअर केली आहे.
त्यामध्ये त्यांनी म्हटले की, काल एका पत्रकाराने एका महिलेचा “कलाकार” असा उल्लेख करत, तिला त्रास व धमक्या दिल्या जात आहेत म्हणत मला प्रतिक्रिया विचारली.
मला त्या व्यक्तीची व तिच्या कलेची काहीही माहिती नव्हती.
पण महिला कलाकाराला धमक्या येणे हे चुकीचे समजून मी बोलून गेलो की कलाकारांना संरक्षण दिले पाहिजे.
मात्र आज त्याचे नकारात्मक पडसाद उमटल्यावर आश्चर्याने या कलाकाराची “कला” मी बघितली.
आता असे वाटत आहे, महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणाऱ्या अशा ‘कले’ला नको रे बाबा संरक्षण !
Web Title : Sambhajiraje Chhatrapati | sambhajiraje chhatrapati says gautami patil needs no protection
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा