Sambhajiraje Chhatrapati | ‘…तर शिवसेनेत असं घडलं नसतं’ – संभाजीराजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sambhajiraje Chhatrapati | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मोठ्या भूमिकेवरून राज्यात प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावरून बैठाकांचं सत्र सुरू झालं आहे. त्यातच एकनाथ शिंदे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करण्याचे एक आव्हानच दिल्याने मोठ्या प्रमाणात चर्चा पसरल्या आहेत. याच घडामोडींवरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 

माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले की, “मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असं घडलं नसतं, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला असं ते म्हणाले. जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मीही बघतोय, काय निर्णय येतो बघू. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढेच मत आहे,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले, “ज्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण गेलं, त्यावेळी बऱ्याच लोकांना वाटत होतं महाराष्ट्रात दंगल व्हावी, पण मी समाजाचं हित पाहिलं, मी कुणाच्या बरोबर आहे हे न बघता त्या स्टेजवर गेलो समाजाला शांत केलं. मी गडकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले. बहुजन समाजाच्या हितासाठी काम केलं. मात्र, जेंव्हा मी महाविकास आघाडी सरकारला सांगितले की, मला पुरस्कृत खासदार करा तेंव्हा तिथे वेगवेगळे पक्ष आले, आघाड्या आल्या पण मी केलेलं काम त्यापुढे शून्य झालं,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | shiv sena sambhajiraje chhatrapati reaction on eknath shinde maharashtra political crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांनी गृहखात्याला झापलं? म्हणाले – ‘एवढे मंत्री रातोरात निघून गेल्याचं कळलं कसं नाही

 

Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ?, शिवसेना नेते संजय राऊत यांचं खळबळजनक ट्विट; म्हणाले…

 

Sharad Pawar And Eknath Shinde | शरद पवार यांच्या नंतरचे राज्यातील सर्वात मोठे बंड; पवार यशस्वी ठरले, एकनाथ शिंदे यशस्वी होतील का?

 

Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’