Sambhajiraje Chhatrapati | ‘मंत्र्यांचे माहित नाही, मी राजवाडा सोडून आलोय…’, संभाजीराजे छत्रपती पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड (Rain in Maharashtra) नुकसान झाले असून एकही मंत्री, पालकमंत्री अद्याप पाहणीसाठी फिरकले नाहीत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी म्हटले की, नुकसान पाहणीसाठी यावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र मी राजवाडा सोडून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहे, अशी भावना संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी व्यक्त केली.

 

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी आज बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीची (Heavy Rain) पाहणी करुन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा (Collector Radhabinod Sharma) यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांनी शेतात पडून खराब झालेला सोयाबीन सोबत आणला होता, तो जिल्हाधिकार्‍यांना दाखवला. तसेच दिवाळीच्या (Diwali -2022) अगोदर शेतकर्‍यांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. या भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

https://www.facebook.com/photo?fbid=649240079906483&set=pcb.649240473239777

 

छत्रपती संभाजीराजे म्हणाले, परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात (Beed District) मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफच्या (SDRF) विशेष बाबीतून बीड जिल्ह्याच्या शेतकर्‍यांसाठी तात्काळ मदत जाहीर करावी. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) सरकारकडून शेतकर्‍यांना मोठी मदत मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

गेल्या चार दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने थैमान घातले आहे
तरी देखील अद्याप एकही मंत्री किंवा बीडचे पालकमंत्री अतुल सावे (Guardian Minister Atul Save)
हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीड जिल्ह्यात आलेले नाहीत.
यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

 

अतिवृष्टीमुळे येथील कापूस, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मांजरसुंबा पाटोदा या रस्त्याचे नव्याने काम करताना त्यावर नाले न बांधल्याने शेतकर्‍यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
तसेच फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

 

Web Title :- Sambhajiraje Chhatrapati | whether ministers should come to inspect the damage is their issue i left the palace and came to the farmers farm says sambhaji raje chhatrapati

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | पुण्यात वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, गाडीतून उतरत त्यांनी… (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | यवतमाळचे संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश करताच, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Pune Crime | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर FDA ची मोठी कारवाई, भेसळयुक्त गुजरात बर्फीचा मोठा साठा जप्त