Sambhajiraje Meets Uadayanraje | ‘दम असेल तर अधिवेशन बोलवावं, आधी राज्याने धाडस करावं, केंद्राचं मी बघतो’; उदयनराजे संतापले (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर उदयनराजे आणि संभाजीराजे (Udayanraje and Sambhajiraje) यांच्यात पुण्यात (Pune) बैठक (Sambhajiraje Meets Uadayanraje) झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे यांनी राज्य सरकारवर (State Government) टीकास्त्र सोडले. यावेळी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्याने एक दिवसाचं विशेष अधिवेशन (Special session) बोलवावं, अशी मागणी भाजप (BJP) खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केली.(Sambhajiraje Meets Uadayanraje)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

काय फालतुगिरी सुरू आहे

केंद्राच्या भूमिकेसंबंधी (Central Government Role) विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, दम असेल तर अधिवेशन बोलवावं.
आधीने राज्याने धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो, असंही ते म्हणाले आहेत.
अधिवेशन बोलवून गायकवाड कमिशनच्या रिपोर्टवर (Gaikwad Commission Report) चर्चा करावी.
आता जस्टीस भोसले (Justice Bhosle) यांचा रिपोर्ट आला आहे.
थप्पी गोळा करुन काय रद्दीत विकून त्यावर राज्य चालवणार का? काय फालतुगिरी सुरु आहे, असा संताप त्यांनी केला.
उदयनराजे पुढे म्हणाले, यांना आधी अधिवेशन घेऊ द्या, मग रुपरेषा ठरवतो.
मग एकेकाला कसं गाठायचं ते मी बघतो असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

आमदार, खासदार धुतल्या तांदळासारखे असतील तर..

मराठा आरक्षण ही राज्याची जबाबदारी आहे. जर हे सगळे आमदार (MLA), खासदार (MP) एवढे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतील तर नेमकी समस्या काय आहे.
उद्धव ठाकरे Uddhav Thackeray, अजित पवार Ajit Pawar सोडून द्या सगळे…मी सगळ्यांबद्दलच विचारतोय. विशेष अधिवेशन बोलवा ना तुम्ही…लाईव्ह प्रक्षेपण (Live broadcast) करा.
पण हे सभागृहात गेल्यावर एक बोलतात आणि बाहेर आल्यावर दुसरं बोलतात, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

 

… पण ही वेळ येणार आहे

आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील (friend) अंतर ठेवून बोलतात.
ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे.
समाजाचा याच्याशी काही संबंध नाही.
आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण (Politics) करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील.
त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही.
आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत.
अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे, अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय

उदयनराजे यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं.
त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय (Maratha reservation is the goal) आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील.
मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केलं जात आहे.
कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे.
न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही, असं उदयनराजेंनी यावेळी सांगितलं.

हा अधिकार दिला कोणी?

राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे.
निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे.
राजेशाही होती तेव्हा असं नव्हतं.
लोकशाही (Democracy) अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाढलं पाहिजे असं ठाम मत आहे.
त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा.
प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे.
किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.

Sambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले – ‘संभाजी राजेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा’ (Video)

कायदा वैगेरे मी मानत नाही

यामध्ये पक्ष आणू नका. मी जे बोलतोय ते सर्वांना लागू होतं. काँग्रेस, भाजपा, आरपीआय, जनता दल (Congress, BJP, RPI, Janata Dal) वैगेरे…मग सरकार किंवा लोकप्रतिनिधी कोणतेही असो.
पण येथे समाजाचा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. भाजपा (BJP) नेत्यांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता उदयनराजेंनी म्हटलं की, पाच बोटं जशी सारखी नसतात तसं प्रत्येकाचं वेगळं मत असतं.
माझी मूल्यं वेगळी आहे. मी जमिनीवर परिस्थिती पाहून चालणार माणूस आहे. कायदा वैगेरे मी मानत नाही.
तसेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गायकवाड कमिशनचा (Gaikwad Commission) अहवालच (Report) वाचलेला नाही, हा माझा आरोप (Allegation) नाही तर ठाम मत आहे असंही म्हटलं.

Web Title : Sambhajiraje Meets Uadayanraje | maratha reservation chhatrapati udayanraje press meet with chhatrapati sambhajiraje

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update