संभल येथे भीषण रस्ता अपघात, रोडवेज बस आणि टँकरची टक्कर, 7 जणांचा मृत्यू, 25 जखमी

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील धानारी पोलिस स्टेशन भागात बुधवारी एनएच 509 वर मोठा रस्ता अपघात झाला. रोडवेज बस आणि टँकर दरम्यान झालेल्या भीषण धडकेत सात जणांचा मृत्यू आणि 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. डीएम आणि एसपी यांच्यासह सर्व उच्च अधिकारी यावेळी उपस्थित आहेत. महामार्ग ठप्प झाला आहे.

जिल्हा प्रशासनाने नुकतीच सात जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो. हा अपघात इतका गंभीर होता की, रोडवेज बसच्या एका बाजूचे पूर्ण नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला
दुसरीकडे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे, त्यांनी घटनास्थळावर मदत पोहोचवण्याचे व बचाव मदत कार्याला सूचना दिल्या आहेत. याशिवाय जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.